Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महानगरपालिका निकालांवर आकाशवाणीचा ‘नगर निवाडा’ कार्यक्रम

अहिल्यानगर : अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालांवर आधारित विशेष कार्यक्रम ‘नगर निवाडा २०२६’ चे थेट प्रसारण आकाशवाणी अहिल्यानगर

साई गाव पालखी सोहळ्यासाठी वाहनांची नोंद करण्याचे आवाहन
महाराष्ट्राच्या राजकारणात होणार उलथापालथ ? संजय राऊत – शरद पवारांची भेट सांगतेय काय ? l पहा LokNews24
अखंड हरिनाम सप्ताहसाठी निघोज ग्रामस्थांचे अमूल्य योगदान ः जंगले महाराज शास्त्री

अहिल्यानगर : अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालांवर आधारित विशेष कार्यक्रम ‘नगर निवाडा २०२६’ चे थेट प्रसारण आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून शुक्रवार, १६ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजल्यापासून करण्यात येणार आहे.

 या विशेष लाईव्ह कार्यक्रमामध्ये महानगरपालिका निवडणूक निकालांचे सखोल विश्लेषण करण्यात येणार असून, जिल्ह्यातील श्रोत्यांना हा कार्यक्रम आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या १००.१ मेगाहर्ट्झ या रेडिओ फ्रिक्वेन्सीवर तसेच न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवरून जगभरात कुठूनही ऐकता येणार आहे.

‘नगर निवाडा २०२६’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्हा, राज्य तसेच देश-विदेशात राहणाऱ्या अहिल्यानगरकरांना आपल्या महानगरपालिकेचे विश्वासार्ह निवडणूक निकाल आकाशवाणीच्या माध्यमातून घरबसल्या ऐकण्याची संधी मिळणार आहे.

 या कार्यक्रमात अहिल्यानगरच्या राजकीय व सामाजिक परिस्थितीची सखोल जाण असलेले विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ सहभागी होणार असून, त्यांच्या अभ्यासपूर्ण विश्लेषणातून श्रोत्यांना निवडणूक निकालांचे व्यापक चित्र समजणार आहे, अशी माहिती आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचे कार्यक्रम प्रमुख सुदाम बटुळे यांनी दिली.

COMMENTS