Homeदखल

अजित पवार : टग्या ते लाचार नेता !

महाराष्ट्राच्या राजकारणाने आजवर अनेक स्थित्यंतरे पाहिली, पण नीतिमत्तेचा इतका मोठा ऱ्हास कधीही अनुभवला नव्हता. ज्या नेत्यावर ७० हजार कोटींच्या सिंच

व्हीएसआर कंपनीचा मालक वैमानिकांच्या सीटवर झोपला
शंकरनगर येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अस्थिकलशाचे दर्शन
भ्रष्ट अधिकार्‍यांवर बडगा उगारात सार्वजनिक बांधकाम विभागात आणावी शिस्त

महाराष्ट्राच्या राजकारणाने आजवर अनेक स्थित्यंतरे पाहिली, पण नीतिमत्तेचा इतका मोठा ऱ्हास कधीही अनुभवला नव्हता. ज्या नेत्यावर ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचे गंभीर आरोप झाले, ज्यांच्या कारभारावर राज्याच्या तिजोरीची लूट केल्याचा शिक्का बसला, तोच नेता आज पुन्हा सत्तेच्या खुर्चीवर बसून ‘प्रशासनाचा वाघ’ असल्याचा आव आणत आहे. हे महाराष्ट्राच्या सुजाण जनतेचे दुर्दैवच म्हणावे लागेल. पुणे येथे नुकत्याच झालेल्या एका पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार यांनी ‘माझ्यावर ही ७० हजार कोटी रूपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप होता; पण, मी आता सत्तेत आहे, असं मुजोर वक्तव्य केले. पण, वस्तुस्थिती जाणणाऱ्यांनी आणि विशेषत: सुधीर मुनगंटीवार यांनी दुसऱ्याच दिवशी अजितदादा पवार यांना सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट नसल्याचे सांगितले.
अजित पवार यांचे नाव घेताच डोळ्यासमोर येतो तो सिंचन घोटाळा. हजारो कोटी रुपये खर्च होऊनही महाराष्ट्राची जमीन तहानलेलीच राहिली. योजना कागदावरच राहिल्या आणि जनतेच्या घामाचा पैसा  नेत्यांच्या खिशात गेला. महाराष्ट्रातील सिंचन घोटाळा हा राज्याच्या राजकीय इतिहासातील सर्वात मोठ्या कथित भ्रष्टाचारांपैकी एक मानला जातो. १९९९ ते २००९ या दशकात जलसंपदा विभागामार्फत झालेल्या खर्चावर आणि प्रकल्पांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. राज्याच्या २०११-१२ च्या आर्थिक पाहणी अहवालात असे नमूद करण्यात आले की, गेल्या १० वर्षांत सिंचनावर ७०,००० कोटी रुपये खर्च झाले असूनही सिंचन क्षेत्रात केवळ ०.१% वाढ झाली आहे. यावर कडी म्हणजे, पाण्यासाठी व्याकुळ झालेल्या जनतेने जेव्हा हक्काचे पाणी मागितले, तेव्हा “धरणं काय मुतून भरायची का?” अशा अत्यंत खालच्या पातळीवरील विधानाने त्यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासला. जनतेच्या जखमेवर मीठ चोळणारा असा नेता जनसेवेचा दावा कसा करू शकतो?
   महाराष्ट्राची राजकीय धुरा ज्या कुशल नेतृत्वाने सांभाळली ते नेते म्हणजे राज्याचे मुत्सद्दी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. महाराष्ट्राचे नेतृत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांभाळल्यापासून अजित पवार यांच्यासारख्या उद्दाम आणि मस्तवाल नेत्याच्या दहशतीपासून महाराष्ट्राच्या ग्रामीण जनतेची सुटका झाल्याची भावना तमाम महाराष्ट्राची बनली आहे. महाराष्ट्राची सत्ता एक जातीय बनवणाऱ्या पवार कुटुंबाला सत्तेतून उखडून टाकणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणूनच महाराष्ट्राच्या जनतेत लोकप्रिय बनले आहेत. शरद पवार यांनी अजित पवार यांच्या सारख्या टग्या नेत्यांना सत्तेत बसवून महाराष्ट्राच्या जनतेला असुरक्षित केले होते. परंतु, देवेंद्र फडणवीस यांचा महाराष्ट्राच्या राजकीय सत्तेत उदय झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रात तळागाळातील कार्कर्त्यांना सत्तेत बसवले. आज राज्यात  ओबीसी समुदायातील अनेक सामाजिक आणि राजकीय नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली दमदारपणे उभे राहिले आहेत.
आज अजित पवार जे उपमुख्यमंत्रिपद भोगत आहेत, ते त्यांच्या कर्तृत्वामुळे नसून पूर्णतः देवेंद्र फडणवीस यांच्या चाणाक्ष राजकीय खेळीमुळे मिळालेली ‘भेट’ आहे. एकेकाळी ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून “चक्की पिसिंग”ची भाषा वापरली गेली, त्यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तशी वेळ निश्चित आणतील, याचा आम्हाला विश्वास आहे. स्वतःला ‘टग्या’ समजणाऱ्या नेत्याला सत्तेच्या प्रवाहात टिकून राहण्यासाठी अखेर त्याच विचारधारेचे पाय धरावे लागले, ज्यांच्याविरोधात त्यांनी राजकारण करण्याचा आव आणला, अखेर, त्यांच्यासमोर त्यांना नतमस्तक व्हावे लागले. हे अजित पवार यांच्या लाचार राजकारणाचे दर्शन आहे. राजकारणात लोकशाहीचा आदर असणे आवश्यक असते, पण अजित पवारांच्या कार्यशैलीत कायमच हुकूमशाही आणि उद्दामपणा दिसून आला आहे. स्वतःच्या सोयीनुसार पक्ष बदलणे, काकांसोबत गद्दारी करणे आणि सत्तेसाठी कोणत्याही थराला जाणे, हीच त्यांची ओळख बनली आहे. महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना अनेकदा नाकारले असूनही, केवळ जोडतोडीच्या राजकारणामुळे ते सत्तेच्या वर्तुळात टिकून आहेत. महाराष्ट्राला आज विकासपुरुषाची गरज आहे, ‘भ्रष्टाचार’ आणि ‘अहंकाराचे’ प्रतीक असलेल्या नेत्याची नाही. सत्तेच्या खुर्चीसाठी स्वतःची नैतिकता गहाण ठेवणारे हे नेतृत्व राज्याला कोणत्या दिशेला नेणार, हा प्रश्न प्रत्येक महाराष्ट्राच्या नागरिकाने विचारला पाहिजे. ज्या नेत्याने जनतेचा अपमान केला, तो नेता राज्याचा आदर्श कधीही होऊ शकत नाही.

COMMENTS