अशक्य ते शक्य करून दाखविण्याची हीच वेळ; या आव्हानाचा सर्वजण मुकाबला करू – छगन भुजबळ

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अशक्य ते शक्य करून दाखविण्याची हीच वेळ; या आव्हानाचा सर्वजण मुकाबला करू – छगन भुजबळ

कोरोनाचे संकट हे संपूर्ण समाजासाठी एक आव्हान असून ते गेल्या वर्षभरापासून आपल्यासमोर येवून ठाकले आहे; आता झुंज रूप बदलणाऱ्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी आहे, अशक्य ते शक्य करून दाखविण्याची हीच वेळ आहे, या परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्वांनी प्रयत्नांची शिकस्त करावी, असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

ऋषभ पंत वर्ल्ड कप आणि आशिया कपमधून बाहेर
राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेत निशिकांतदादा स्पोर्ट्स फाउंडेशन संघास विजेतेपद
महागाईचा आलेख उंचावलेलाच

नाशिक : कोरोनाचे संकट हे संपूर्ण समाजासाठी एक आव्हान असून ते गेल्या वर्षभरापासून आपल्यासमोर येवून ठाकले आहे; आता झुंज रूप बदलणाऱ्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी आहे, अशक्य ते शक्य करून दाखविण्याची हीच वेळ आहे, या परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्वांनी प्रयत्नांची शिकस्त करावी, असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. ते आज जिल्ह्यातील कोरोना आढावा बैठकीत अधिकाऱ्यांशी संवाद साधताना बोलत होते. 

 जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात झालेल्या या बैठकीत विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पांडेय, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, अन्न औषध प्रशासनाच्या सह आयुक्त माधुरी पवार, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोर श्रीवास, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल सैदाणें, डॉ. अनंत पवार आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना पालकमंत्री भुजबळ म्हणाले, नाशिक हे उत्तर महाराष्ट्राचे मुख्यालय आहे. ओघानेच येथील आरोग्य विषयक सेवा-सुविधांचा लाभ घेण्यासाठी विभागातल्या विविध जिल्ह्यातून रूग्ण येतात. प्रत्येक रूग्णाला उपचारासाठी आपण सज्ज रहायला हवे. सर्वप्रथम शहरी व ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण करून बेड, व्हेंटीलेटर्स, ऑक्सिजनच्या पुरेशा साधन सुविधा उपलब्ध करून द्यायला हव्यात. गृहविलगीकरणाच्या शास्रशुद्ध मार्गदर्शक सूचनांचे पालन होतेय किंवा नाही? यासाठी त्याचे काटेकोर निरीक्षण करण्याची गरज आहे. त्यासाठी मनपा आणि पोलीस यंत्रणेला आता अत्यंत सावधानपणे हातात हात घालून काम करावे लागणार आहे. लागणारे मनुष्यबळ, लागणारी साधने एखाद्या ठिकाणी जर उपयोगात येत नसतील तर ती ताबडतोब जेथे गरजेची आहेत तेथे रवाना करून तातडीच्या उपाययोजना कराव्यात. नाशिक महापालिकेच्या बेड न मिळालेल्या रुग्णाच्या प्रकरणात यापूर्वीच संबंधिताविरुद्ध पोलिसांमध्ये मनपाकडून फिर्याद दाखल करण्यात आलेली असून त्याची योग्य ती चौकशी पोलीस आयुक्त करतील. महापालिका क्षेत्रातील वाढती रुग्ण संख्या विचारात घेता महापालिकेने त्यांच्या अखत्यारीतील सर्व रुग्णालयांमध्ये तात्काळ एक हजारांच्या क्षमतेने बेडसह सुविधा निर्माण करण्यात याव्यात असेही भुजबळ यांनी सांगितले. त्याच प्रमाणे जिल्हा रुग्णालयातील कोरोना वॉर्ड चे रूपांतर नॉन कोरोना वॉर्डमध्ये व नॉन कोरोना वॉर्ड चे रूपांतर कोरोना वॉर्ड मध्ये करून जास्तीत जास्त बेड रुग्णांना उपलब्ध करण्याच्या सूचना जिल्हा शल्य चिकित्सक यांना दिल्या. ग्रामीण भागातील रुग्ण संख्येमध्ये सुद्धा झपाट्याने वाढ होत असल्याने भविष्यातील तजवीज म्हणून एसएमबीटी आणि एमवीपी ही दोन रुग्णालये शासन निर्णयानुसार तातडीने अधिग्रहित करण्यात यावीत असे निर्देश भुजबळ यांनी दिले. मागील वर्षी करण्यात आलेल्या सर्व उपाययोजना पुन्हा अमलात आणाव्यात विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे परिस्थिती मागील वर्षी पेक्षा गंभीर असल्याने मागील वर्षी ज्या ज्या उपाययोजना केल्या होत्या त्याचे अवलोकन करून त्या उपाय योजना पुन्हा अधिक प्रभावीपणे अमलात आणण्याची गरज असल्याचे यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सांगितले. परिस्थिती कठीण पण सर्वजण मिळून मात करू जिल्हाधिकारी सूरज मांढरे कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी पण अनेकदा अतिगंभिर प्रसंग आले परंतु आपण संयम ढळू न देता त्यावर मात केली. आता त्यापेक्षा कैकपटींनी अधिक कठीण परिस्थिती आहे, याची जाणीव ठेवून अधिक कार्यक्षमतेने व तयारीनिशी आपल्याला सामोरे जावे लागणार आहे. आपण या परिस्थितीवर मात करण्याकरता आपली पूर्ण क्षमता पणाला लावू असा विश्वास यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी व्यक्त केला. यावेळी झालेल्या चर्चेत नाशिक महानगर पालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांनी शहरांमध्ये उपलब्ध असलेल्या बेड बाबत नागरिकांना अधिक सहज रित्या माहिती पोहोचणे बाबतची यंत्रणा उभी करण्यात येईल तसेच खासगी रुग्णालयांकडून आकारल्या जाणाऱ्या अतिरिक्त शुल्काची वसुली तातडीने सुरू करण्यात येईल असे सांगितले. शहर पोलीस आयुक्त दीपक पांण्डेय यांनी कंटेनमेंट क्षेत्रातील सर्व नियमांचे पालन सर्व नागरिक व आस्थापना करतील यादृष्टीने कठोर कारवाई पोलीस विभागामार्फत करण्यात येईल असे सांगितले. पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा शल्यचिकित्सक रत्ना रावखंडे यांनी आपापल्या क्षेत्रातील उपाययोजना सांगून सहभाग घेतला

COMMENTS