आ. काळेंच्या आक्रमक भूमिकेनंतर कंपनी प्रतिनिधींचा निर्णय कोपरगाव : तालुक्यात शेतकऱ्यांना युरिया खत वेळेवर मिळत नसल्यामुळे जिल्हा कृषी अधीक्षक यांना पत्र व्यवहार करूनही सुधारणा न झाल्यामुळे आ.आशुतोष काळे यांनी जिल्हा कृषी अधीक्षक व युरिया सप्लायर कंपन्यांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक घेतली. कारणे सांगू नका, युरिया किती देणार ते सांगा असा आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे सर्व कंपन्यांच्या प्रतिनिधींनी मिळून कोपरगाव तालुक्याला एका महिन्यात २ हजार टन युरियाचा पुरवठा करणार असल्याचे सांगितले. रब्बीचा हंगाम सुरू असतांना शेतकऱ्यांना युरिया खत वेळेत उपलब्ध होत नाही त्याबाबत आ.आशुतोष काळे यांनी जिल्हा कृषी अधीक्षक यांना पत्रव्यवहार करून कोपरगाव तालुक्यात युरिया खताचा पुरवठा सुरळीत करावा अशा सूचना केल्या होत्या; परंतु अजूनही शेतकऱ्यांना युरिया मिळत नसल्यामुळे आ.आशुतोष काळे यांनी गुरुवारी (दि.८) कर्मवीर शंकरराव काळे कारखाना कार्यस्थळावर जिल्हा कृषी अधीक्षक, कृषी अधिकारी व युरिया सप्लायर कंपन्यांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक घेऊन त्यांची चांगलीच झाडा झडती घेतली. आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे सर्व युरिया सप्लायर कंपन्यांच्या प्रतिनिधींनी एक महिन्यात २ हजार टन युरियाचा पुरवठा करणार असल्याची ग्वाही जिल्हा कृषी अधीक्षकांच्या व तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आ.आशुतोष काळे यांना दिली आहे. यंदा चांगले पर्जन्यमान झाल्यामुळे बदललेली पीक पद्धती व मका क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे युरियाची टंचाई अधिकच जाणवू लागली आहे. तसेच युरिया घेतांना युरिया विक्रेते शेतकऱ्यांना लिंकिंग अर्थात युरिया सोबत इतर पुरवणी कृषी औषधांची खरेदी करण्याचा आग्रह करत आहे. शेतकऱ्यांना येत असलेल्या या अडचणीची दखल घेऊन आ. काळे यांनी बैठक घेऊन युरिया सप्लायर कंपन्यांच्या प्रतिनिधींना चांगलेच खडे बोल सुनावले. या बैठकीसाठी जिल्हा कृषी अधीक्षक सुधाकर बोराळे, जिल्हा परिषद कृषी विभागाचे सुधीर शिंदे, तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे, जिल्हा कृषी निरीक्षक राहुल ढगे, विविध कंपन्यांचे प्रतिनिधी, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक उपस्थित होते.

आ. काळेंच्या आक्रमक भूमिकेनंतर कंपनी प्रतिनिधींचा निर्णय
कोपरगाव : तालुक्यात शेतकऱ्यांना युरिया खत वेळेवर मिळत नसल्यामुळे जिल्हा कृषी अधीक्षक यांना पत्र व्यवहार करूनही सुधारणा न झाल्यामुळे आ.आशुतोष काळे यांनी जिल्हा कृषी अधीक्षक व युरिया सप्लायर कंपन्यांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक घेतली. कारणे सांगू नका, युरिया किती देणार ते सांगा असा आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे सर्व कंपन्यांच्या प्रतिनिधींनी मिळून कोपरगाव तालुक्याला एका महिन्यात २ हजार टन युरियाचा पुरवठा करणार असल्याचे सांगितले.
रब्बीचा हंगाम सुरू असतांना शेतकऱ्यांना युरिया खत वेळेत उपलब्ध होत नाही त्याबाबत आ.आशुतोष काळे यांनी जिल्हा कृषी अधीक्षक यांना पत्रव्यवहार करून कोपरगाव तालुक्यात युरिया खताचा पुरवठा सुरळीत करावा अशा सूचना केल्या होत्या; परंतु अजूनही शेतकऱ्यांना युरिया मिळत नसल्यामुळे आ.आशुतोष काळे यांनी गुरुवारी (दि.८) कर्मवीर शंकरराव काळे कारखाना कार्यस्थळावर जिल्हा कृषी अधीक्षक, कृषी अधिकारी व युरिया सप्लायर कंपन्यांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक घेऊन त्यांची चांगलीच झाडा झडती घेतली. आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे सर्व युरिया सप्लायर कंपन्यांच्या प्रतिनिधींनी एक महिन्यात २ हजार टन युरियाचा पुरवठा करणार असल्याची ग्वाही जिल्हा कृषी अधीक्षकांच्या व तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आ.आशुतोष काळे यांना दिली आहे.
यंदा चांगले पर्जन्यमान झाल्यामुळे बदललेली पीक पद्धती व मका क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे युरियाची टंचाई अधिकच जाणवू लागली आहे. तसेच युरिया घेतांना युरिया विक्रेते शेतकऱ्यांना लिंकिंग अर्थात युरिया सोबत इतर पुरवणी कृषी औषधांची खरेदी करण्याचा आग्रह करत आहे. शेतकऱ्यांना येत असलेल्या या अडचणीची दखल घेऊन आ. काळे यांनी बैठक घेऊन युरिया सप्लायर कंपन्यांच्या प्रतिनिधींना चांगलेच खडे बोल सुनावले.
या बैठकीसाठी जिल्हा कृषी अधीक्षक सुधाकर बोराळे, जिल्हा परिषद कृषी विभागाचे सुधीर शिंदे, तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे, जिल्हा कृषी निरीक्षक राहुल ढगे, विविध कंपन्यांचे प्रतिनिधी, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक उपस्थित होते.

COMMENTS