Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य कबड्डी संघात यशराज खुरंगेची निवड

 कर्जत : येथील समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या क्रीडा परंपरेला नवा मान मिळाला असून, ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी यशराज नामदेव खुरंगे याची महाराष्ट्र राज्याच्या 17 वर्षांखालील कबड्डी संघात निवड झाली आहे. या निवडीमुळे समर्थ विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. संगमनेर येथे 10 ते 12 डिसेंबर 2025 या कालावधीत झालेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेनंतर महाराष्ट्रातील सातही विभागांतील उत्कृष्ट खेळाडूंची निवड चाचणी घेण्यात आली. या कठीण निवड प्रक्रियेतून समर्थ विद्यालयाचा खेळाडू यशराज खुरंगे याची महाराष्ट्र राज्य संघात निवड झाली आहे. भारतीय शालेय क्रीडा महासंघाच्या वतीने 7 ते 11 जानेवारी 2026 या कालावधीत तेलंगाना राज्यात 69 व्या राष्ट्रीय शालेय कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, या स्पर्धेत महाराष्ट्र राज्य संघाचे प्रतिनिधित्व यशराज खुरंगे करणार आहे. ही बाब समर्थ विद्यालयासाठी तसेच कर्जत तालुक्यासाठी अभिमानास्पद आहे. यापूर्वी समर्थ विद्यालयाच्या 17 वर्षे वयोगटाच्या कबड्डी संघाने तालुकास्तर व जिल्हास्तर स्पर्धांमध्ये विजेतेपद पटकावले असून, विभागस्तरीय स्पर्धेत उपविजेतेपद मिळवले आहे. यशराजच्या या यशात विद्यालयातील शिस्तबद्ध प्रशिक्षण, क्रीडा संस्कार आणि मार्गदर्शनाचा मोठा वाटा आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल समाज प्रबोधन संस्थेचे अध्यक्ष नामदेव राऊत, विद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत राऊत, क्रीडा शिक्षक विलास तोरडमल, पल्लवी भांडवलकर तसेच सर्व शिक्षकवृंद यांनी यशराज खुरंगे याचे अभिनंदन करून त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्र राज्य 17 वर्षे वयोगट कबड्डी संघ पुढीलप्रमाणे – किशोर जगताप, हर्षवर्धन पाटील, शिवम पाटील, आर्यन पोलकर, यशराज खुरंगे, ओमराज नरुटे, बालाजी नागरगोजे, सिद्धार्थ पाटील, ध्रुव डोंगरे, सचिन चव्हाण, शंतनू म्हस्के, सार्थक रेपाळ.

दादा पाटील’च्या शाहिदची अधिकारी पदाला गवसणी 
प्रवीण घुलेंच्या नेतृत्वाखाली काँग्रेस करणार नगरपंचायतीच्या १७ उमेदवारांची तयारी
कर्जत शहरात माजी आमदार व नगराध्यक्षांच्या कुटुंबावर हल्ला

COMMENTS