Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हॉटेल कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या

देवळाली प्रवरा  : राहुरी फॅक्टरी परिसरातील श्रीरामपूर रोड लगत असलेल्या हॉटेल श्रद्धाच्या पाठीमागील बाजूस हॉटेलमध्ये काम करणाऱ्या तरुणाने गळफास घेऊ

मजूर पाहायला आलेल्यांना राहुरीत लुटले
वाढदिवसाचे चॉकलेट ठरले आयुष्याचा टर्निंग पॉइंट !
पावसाळ्यात जशा छत्र्या उगवतात तसं विकासकामांचे श्रेय घेण्यासाठी काही जणांची धडपड

देवळाली प्रवरा  : राहुरी फॅक्टरी परिसरातील श्रीरामपूर रोड लगत असलेल्या हॉटेल श्रद्धाच्या पाठीमागील बाजूस हॉटेलमध्ये काम करणाऱ्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना    उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

 याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की, हॉटेल श्रद्धाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये संबंधित कामगार राहत होता. आज सकाळी बराच वेळ तो बाहेर न आल्याने सहकाऱ्यांनी शेडकडे पाहणी केली असता, त्याने गळफास घेतल्याचे आढळून आले. यानंतर तातडीने ही माहिती राहुरी पोलिसांना देण्यात आली.

 मयत तरुणाचे नाव विशाल चिंतामण जगताप (वय २५ वर्षे) असे असून तो अहिल्यानगर एमआयडीसी येथील रहिवासी होता. तो हॉटेल श्रद्धामध्ये काम करत असल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, या प्रकरणाचा पुढील तपास राहुरी पोलीस करत आहेत.

COMMENTS