Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रीतिसुधाजी शैक्षणिक संकुलात बालआनंद मेळावा उत्साहात

राहाता :  येथील प्रीतिसुधाजी शैक्षणिक संकुलात शाळेच्या वर्धापन दिनानिमित्त बाल आनंद मेळाव्याचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास डॉ. पांड

राहाता नगरपरिषद विकास कामात राज्यात अव्वल राहील : पालकमंत्री विखे 
नगर- मनमाड महामार्गावर युवकाचा अपघाती मृत्यू
महाराष्ट्राची फार मोठी हानी : डॉ.पिपाडा

राहाता :  येथील प्रीतिसुधाजी शैक्षणिक संकुलात शाळेच्या वर्धापन दिनानिमित्त बाल आनंद मेळाव्याचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास डॉ. पांडुरंग गुंजाळ, डॉ. मधुकर देशमुख, संस्थेच्या अध्यक्षा स्नेहलता डांगे, उपाध्यक्ष शशिकांत डांगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या मेळाव्यात शाळेतील विद्यार्थ्यांनी विक्रेत्यांची भूमिका साकारत शाळेच्या हिरव्यागार लॉनवर फळे, भाजीपाला तसेच विविध वस्तूंची सुमारे २०० दुकाने थाटली. 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले तसेच शाळेचे संस्थापक प्राचार्य इंद्रभान डांगे यांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी भगवानराव डांगे, मेघश्याम डांगे, माणिकराव धनवटे, शिवाजी देवढे, प्राचार्य ज्ञानेश डांगे, संचालिका पूनम डांगे आदी मान्यवर उपस्थित होते.

बाल आनंद बाजार संकल्पनेविषयी माहिती देताना प्राचार्य ज्ञानेश डांगे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना व्यवहारिक ज्ञान मिळावे या उद्देशाने सुमारे पन्नास वर्षांपूर्वी या संकुलात आनंद बाजार ही संकल्पना सुरू करण्यात आली. शिक्षणासोबतच व्यापारी मूल्यांची शिकवण देणारे हे प्रभावी माध्यम असून, आज ही संकल्पना अनेक शाळांमध्ये राबविली जात आहे, असेही त्यांनी नमूद केले.

या सोहळ्यास शाळेची माजी विद्यार्थिनी प्रांजल नाईकवाडी हिची विशेष उपस्थिती होती. शाळेने दिलेले संस्कार आयुष्यभर मार्गदर्शक ठरतात, असे भावनिक उद्गार तिने आपल्या भाषणातून व्यक्त केले.कार्यक्रमास प्राचार्या डॉ. पूर्वी हलपती, मुख्याध्यापिका स्वाती धनवटे, जालिंदर धनवटे, दत्ता मामा सदाफळ, अनुपमाताई डांगे, शोभाताई डांगे, मंगलताई डांगे, गंगोत्री देवढे आदी उपस्थित होते.मान्यवरांचे स्वागत अशोक गाढवे यांनी केले तर प्रास्ताविक प्रा. सचिन गिते यांनी केले.

COMMENTS