Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रवंदे केंद्रशाळेत बाल आनंद मेळावा उत्साहात

कोपरगाव : तालुक्यातील रवंदे येथील पी.एम. श्री. जिल्हा परिषद केंद्रशाळेत शनिवारी बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात पालक व गावातील

इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमामुळे वाचनसंस्कृती हरवत  चालली : प्राचार्य डॉ. बबन चौरे
ओबीसी आरक्षणासाठी समताचा एल्गार ; नगरला रस्ता रोको आंदोलनात झाली निदर्शने
बसच्या सीटखाली ठेवलेला दागिन्यांचा डबा लांबवला

कोपरगाव : तालुक्यातील रवंदे येथील पी.एम. श्री. जिल्हा परिषद केंद्रशाळेत शनिवारी बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात पालक व गावातील ग्रामस्थांनी ग्राहकांची भूमिका बजावत चिमुकल्या विद्यार्थ्यांनी थाटलेल्या दुकानांतून खरेदी करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

 यावेळी इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी फळे, भाजीपाला, विविध खाद्यपदार्थ तसेच शालेय साहित्याची आकर्षक दुकाने मांडली होती. गावातील नागरिक, पालक, दुकानदार, महिला शिक्षिका, शिक्षक व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खरेदी केली. या बाल आनंद मेळाव्यात चिमुकल्या व्यापाऱ्यांनी सुमारे २० ते २५ हजार रुपयांची उलाढाल केल्याने सर्वत्र कौतुकाची चर्चा होती.

 मुलांना आगळावेगळा व नावीन्यपूर्ण अनुभव देणे, त्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव देणे तसेच प्रत्यक्ष कृतीतून व्यवहारज्ञानाचे शिक्षण देणे, या उद्देशाने बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे शाळेचे मुख्याध्यापक प्रभाकर कदम यांनी सांगितले. या मेळाव्याचे उद्घाटन रवंदे गावचे उपसरपंच ऋषिकेश कदम यांच्या हस्ते झाले.

 याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शशिकांत सोनवणे, आनंदराव कदम, भाऊसाहेब घोटेकर, गणेश घायतडकर, दत्तात्रय शिंदे, शशिकांत घायतडकर, गणेश काळे, रविंद्र घायतडकर, संजय कंक्राळे आदी अधिकारी, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र बागले, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य तसेच शिक्षणप्रेमी ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक अशोक कानडे यांनी केले. मेळावा यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.

COMMENTS