औंध / वार्ताहर : औंध उपसा सिंचन योजनेचा प्रस्ताव राज्यपाल यांच्याकडे मंजूरीसाठी आहे. राज्यपालांना अनुशेषाच्या मुद्यावर त्यांची भेट घेऊन चर्चा क

औंध / वार्ताहर : औंध उपसा सिंचन योजनेचा प्रस्ताव राज्यपाल यांच्याकडे मंजूरीसाठी आहे. राज्यपालांना अनुशेषाच्या मुद्यावर त्यांची भेट घेऊन चर्चा करतो. औंध उपसा सिंचन योजनेला निधी देण्यासाठी आमचे महायुतीचे सरकार अनुकूल आहे. उपसा सिंचन योजनेचा राज्यपालांची मंजुरी घेऊन येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या योजनेला निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
औंध, ता. खटाव येथे औंधसह 21 गावातील शिष्टमंडळाने उपसा सिंचन योजनेला निधी मिळावा. यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाशी चर्चा करताना ते बोलत होते. यावेळी गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी, सुरेंद्र गुदगे, हणमंतराव शिंदे, राजेंद्र माने, मनोज देशमुख, पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष संतोष मांडवे, शुभम शिंदे, जालिंदर राऊत, प्रताप देशमुख, शिवाजी जाधव, अमर देशमुख, राजेंद्र देशमुख, पै. मंगेश फडतरे, अमोल फडतरे, गणेश देशमुख, हणमंत चव्हाण, नितीन जाधव, महादेव जाधव, प्रेमनाथ शिंदे, सोमनाथ साठे, सत्यवान पाटोळे, ज्ञानेश्वर शिंदे, विनायक पवार, संजय जाधव, बाबासाहेब घार्गे, धनाजी घार्गे, किसन देशमुख, यशवंत देशमुख, नवनाथ देशमुख, सुनील मिसाळ, कुलदीप इंगळे उपस्थित होते.
या योजनेच्या प्रस्तावाबाबत त्यांनी फोनवरून थेट महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणचे अधिकारी राजेंद्र मोहिते यांच्याशी फोनवर संपर्क साधला. शिष्टमंडळाला त्यांनी सांगितले की, औंध उपसा सिंचन योजनेला सुधारीत प्रशासकीय मंजुरी घ्यावी लागेल. औध उपसा सिंचन योजनेसाठी पाणी उपलब्ध करून दिले आहे. उपसा सिंचन योजनेपुढे अनुशेषाचा मुद्दा असला तरी खास बाब म्हणून राज्यपालांची भेट घेऊन योजनेला मंजुरी देण्यासाठी राजी करु. राज्यपालांची मान्यता मिळताच निधी देण्यासाठी शासन हात आखडता घेणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात योजनेला टोकण म्हणून काही निधी देणार असल्याची शिष्टमंडळाला ग्वाही दिली.

COMMENTS