राज्याध्यक्ष बाळासाहेब सोनवणे यांचा महिरावणी जि.प.शाळेत सत्कार नाशिक:प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी अधिकारी संघटनेच्या राज्याध्यक्

राज्याध्यक्ष बाळासाहेब सोनवणे यांचा महिरावणी जि.प.शाळेत सत्कार
नाशिक:प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी अधिकारी संघटनेच्या राज्याध्यक्षपदी बाळासाहेब दादा सोनवणे यांची एकमताने निवड झाल्याबद्दल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, महिरावणी यांच्यावतीने त्यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
गेल्या अनेक वर्षांपासून बाळासाहेब सोनवणेसर यांनी दिव्यांग कर्मचारी,अधिकारी व दिव्यांग बेरोजगार यांच्या विविध प्रश्नांवर शासनदरबारी व सामाजिक पातळीवर ठाम व आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊनच त्यांची राज्याध्यक्षपदी निवड करण्यात पण आपल्या महिरावणीसाठी अभिमानाची बाब आहे. असे मत मुख्याध्यापक दीपक उशीर यांनी व्यक्त केले. अष्टपैलू व्यक्तिमत्त्व व नेतृत्वगुण असलेल्या श्री. सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील दिव्यांगांच्या न्याय, हक्क व प्रश्नांना निश्चितच योग्य दिशा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.यावेळी सत्कारास उत्तर देताना दिव्यांग संघटनेचे नवनियुक्त राज्याध्यक्ष बाळासाहेब सोनवणे यांनी जि प शाळेचे आभार मानत,दिव्यांगांच्या सेवेसाठी अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणा या सन्मानामुळे मिळाल्याचे सांगितले.
यावेळी शाळेतील शिक्षक सुनील भामरे, रवींद्र चौरे, सुनील शिंदे, श्रीमती कल्पना चौधरी, वंदना साईनकर, अलका वाणी, शीतल सूर्यवंशी आदी शिक्षकवृंद उपस्थित होते.

COMMENTS