केज । प्रतिनिधीबीड रोडवरील शिक्षक कॉलनी मित्र परिवाराच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) चे नेते हारुणभाई इनामदार यांचा दि. 01/0

केज । प्रतिनिधी
बीड रोडवरील शिक्षक कॉलनी मित्र परिवाराच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) चे नेते हारुणभाई इनामदार यांचा दि. 01/01/2026 रोजी हृदयपूर्वक सत्कार करण्यात आला. हभप राष्ट्रसंत भगवान बाबा मंदिरासमोर झालेल्या या सोहळ्यात सामाजिक सलोखा आणि मैत्रीचे अनोखे दृश्य पाहायला मिळाले.
सत्कारसोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ हारुणभाई इनामदार यांचेच नव्हे तर रमाकांत ढाकणे सर, योगेश हांगे आणि अनिल चौरे यांसारख्या विविध क्षेत्रातील व्यक्तींना त्यांच्या विशेष कार्याबद्दल गौरवण्यात आले. कार्यक्रमाला केजच्या नगराध्यक्षा सौ. सिताताई बनसोडे, नगरसेवक पद्मिनीबाई शिंदे, आमेर इनामदार सरकार, सागर बनसोड, सोहेब नेते इनामदार आणि मुजाहिद इनामदार यांच्या प्रमुख उपस्थितीने शोभा वाढली. या मान्यवरांच्या हस्ते सर्व सत्कारमूर्तींना सन्मानित करण्यात आले. युवकांचा उत्साह आणि सहभाग हा या स्नेह सोहळ्याचा प्रमुख ठळक पैलू होता. पत्रकार प्रकाश मुंडे आणि खय्युम शेख यांनीही विशेष उपस्थिती लावली. शिक्षक कॉलनीतील युवकांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोठी मेहनत घेतली. या सोहळ्यात प्रामुख्याने बाबासाहेब केदार सर, रवि घुले, चंदू चौरे, गोटू भैय्या पाळवडे, वैभव (सोनू) धस, अमोल धस, अमोल मुंडे, बबलू साखरे, मनोज शिंदे, अमोल ठोंबरे, अतुल ठोंबरे, आशिष केदार, विकास मुळे, केशव बच्छाव, सोहम अंधारे, शशिकांत ढाकणे सर आणि नवनाथ घुले यांच्या उपस्थितीत मोठ्या संख्येने युवक व नागरिक सहभागी झाले. शिक्षक कॉलनी मित्रपरिवार आणि परिसर सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमांत नेहमीच अग्रणी राहतो. या भव्य सत्कार सोहळ्यामुळे कॉलनीतील एकता आणि स्नेह यांची चर्चा संपूर्ण परिसरात होत असून, सर्व स्तरांतून सत्कारमूर्तींवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

COMMENTS