Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगर पालिका सभापतीपदी जैतुल्ला खान यांची निवड करावी

अपक्ष उमेदवार सय्यद मोहम्मद अमिन यांची जाहीर मागणीबीड । प्रतिनिधीनगर पालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक तथा वॉर्

‘आप’ची वाटचाल
राहाता शहरात मांज्यामुळे दहा वर्षाचा मुलगा जखमी
मुक्या प्राण्यांसाठी नगरमध्ये होणार 100 पाणवठे

अपक्ष उमेदवार सय्यद मोहम्मद अमिन यांची जाहीर मागणी
बीड । प्रतिनिधी
नगर पालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक तथा वॉर्ड क्रमांक 6 मधून विजयी झालेले जैतुल्ला खान यांना नगरपालिकेच्या सभापती पदावर संधी द्यावी, अशी ठाम मागणी अपक्ष उमेदवार सय्यद मोहम्मद अमिन यांनी केली आहे.
निवडणुकीपूर्वीच जैतुल्ला खान यांना बिनशर्त पाठिंबा दिल्याचे स्पष्ट करताना सय्यद मोहम्मद अमिन म्हणाले की, हा पाठिंबा कोणत्याही सत्ताकारणासाठी नव्हता, तर वॉर्ड आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी होता. जोडणी होण्यापूर्वीच विकासाचा समान अजेंडा ठरवून खान यांना पाठिंबा देण्यात आला होता, असेही त्यांनी नमूद केले. जैतुल्ला खान हे अनुभवी, अभ्यासू आणि प्रशासनावर पकड असलेले नेतृत्व आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा संपूर्ण शहराला व्हावा, याच उद्देशाने मी त्यांना साथ दिली. आता जनतेने कौल दिल्यानंतर पक्षाने त्यांच्या ज्येष्ठतेचा सन्मान करून त्यांना सभापती पद द्यावे, अशी ठाम भूमिका अमिन यांनी मांडली. वॉर्ड क्रमांक 6 मध्ये जैतुल्ला खान व सय्यद मोहम्मद अमिन यांची राजकीय केमिस्ट्री यशस्वी ठरली असून, ही जोडी पुढील काळात शहराच्या राजकारणात ‘पॉवर गेम’ ठरेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. आम्ही निवडणुकीपूर्वीच विकासाचा आराखडा तयार केला होता. जैतुल्ला खान यांना सभापती पद मिळाल्यास वॉर्डसह संपूर्ण शहरातील प्रश्न अधिक वेगाने मार्गी लागतील, असे मत अमिन यांनी व्यक्त केले. अनुभवाला प्राधान्य देत ज्येष्ठ नगरसेवक म्हणून जैतुल्ला खान यांना सभापती पद देण्यात यावे, हीच जनतेची व कार्यकर्त्यांची अपेक्षा असल्याचेही अमिन यांनी स्पष्ट केले.

COMMENTS