Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतकरी संरक्षण कायद्यासाठी भारतीय जनसंसदेचे आंदोलन

अहिल्यानगर ः शेतकर्‍यांच्या मूलभूत प्रश्‍नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय जनसंसदेच्या वतीने 31 डिसेंबरच्या रात्री अहिल्यानगर आंदोलन करण्यात

इराणमध्ये आंदोलनांना हिंसक वळण; 217 जणांचा मृत्यू
मनमाड महामार्गाच्या दुरावस्थेबाबत फलक लावून निषेध
Sangamner : खड्ड्यांमध्ये शिवप्रतिष्ठाणचे वृक्षलागवड आंदोलन

अहिल्यानगर ः शेतकर्‍यांच्या मूलभूत प्रश्‍नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय जनसंसदेच्या वतीने 31 डिसेंबरच्या रात्री अहिल्यानगर आंदोलन करण्यात आल्याची माहिती भारतीय जनसंसदेचे जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे यांनी दिली.  
या आंदोलनातून एक रुपयात पिकविमा, जुन्या पिकविमा योजनेची पुनबहाली, थकबाकीदार व नियमित कर्जफेड करणार्‍या सर्व शेतकर्‍यांना समान कर्जमाफी, वन्यप्राण्यांमुळे होणार्‍या नुकसानीस भरीव व तातडीची मदत, बिबट्यांच्या दहशतीवर ठोस उपाय, 100 टक्के अनुदानावर सौर/तार कुंपण, दिव्यांगांसाठी शेती सुविधा, शेततळ्यांचे आकारमान व अनुदान वाढ, सर्व पिकांना वाढीव हमीभाव आणि जुनी प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू करावी आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री व कृषी मंत्र्यांना जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांच्यामार्फत सादर करण्यात आले असून, शेतकर्‍यांचे शेकडो प्रश्‍न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी स्वतंत्र शेतकरी संरक्षण कायदा करण्यात यावा, अशी ठाम भूमिका भारतीय जनसंसदेने मांडली आहे, अशी माहिती संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी दिली. यावेळी करण्यात आलेल्या आंदोलनात अ‍ॅड. विद्या विजय शिंदे, संतोष उर्फ  पप्पू गुंड यांच्यासह भारतीय जनसंसदेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS