Homeमहाराष्ट्रअहमदनगर

श्रीरामपूरमध्ये बंटी जहागीरदारवर गोळीबार

श्रीरामपूर : शहरात बुधवारी (दि. 31) दुपारी गोळीबाराची थरारक घटना घडून आल्याने एकच खळबळ उडाली. शहरातील बंटी जहागीरदार यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी

पाथर्डी पोलिसांची कामगिरी;  २७ लाखांचा मुद्देमाल जप्त
राहुरीत पतीचा गळा दाबून खून
डॉक्टरची दीड कोटींची फसवणूक

श्रीरामपूर : शहरात बुधवारी (दि. 31) दुपारी गोळीबाराची थरारक घटना घडून आल्याने एकच खळबळ उडाली. शहरातील बंटी जहागीरदार यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला असून, या घटनेमुळे संपूर्ण शहरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बंटी जहागीरदार हे कब्रस्तानात आपले काम आटोपून परतत होते. कब्रस्तानातून बाहेर पडल्यानंतर जर्मन हॉस्पिटलसमोरील मुख्य गेटजवळ दबा धरून बसलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर अचानक गोळीबार केला. गोळीबाराचा आवाज होताच परिसरात एकच पळापळ उडाली. हल्ला केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. गोळीबारानंतर परिसरात पळापळ झाली असून, शहरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी शहरात बंदोबस्त वाढवला आहे. या गोळीबारात जखमी झालेल्या बंटी जहागीरदार यांना तातडीने उपचारासाठी कामगार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यात सुमारे सातच्या आसपास गोळ्या घातल्याची चर्चा असून पोलिसांनी घटनास्थळावरून काही रिकामं काडतुस ताब्यात घेतली आहेत. परंतु नेमक्या किती गोळ्या झाडल्या, याबाबत पोलिसांकडून माहिती समजली नव्हती. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर, श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्यासह फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी पाहणी करून पुरावे संकलित केले. या घटनेमागील कारणांचा शोध सुरू असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

COMMENTS