Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महापालिका निवडणुकीत अपक्षांना सफरचंद, बिस्कीट, पावसह 194 चिन्हे; राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय

नागपूर / प्रतिनिधी : नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 च्या पार्श्‍वभूमीवर उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. राज्य

बहादुरवाडीच्या सुपुत्रास गोव्यात साहित्य पुरस्कार जाहीर
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी राजीनामा द्यावा : शाकीर तांबोळी
माजी मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त कराडमध्ये आयोजित कुस्ती स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

नागपूर / प्रतिनिधी : नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 च्या पार्श्‍वभूमीवर उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने अपक्ष उमेदवारांसाठी तब्बल 194 मुक्त निवडणूक चिन्हे उपलब्ध करून दिली आहेत. या यादीत खाद्य पदार्थांशी संबंधित अनेक चिन्हांचा समावेश असून, त्यात सफरचंद, बिस्कीट, पाव, केक, ढोबळी मिरची यांसारखी चिन्हे आहेत.
अपक्ष उमेदवारांच्या चिन्हांमध्ये फुलकोबी, नारळ, ऊस, आले, द्राक्ष, हिरवी मिरची, फणस, भेंडी, मका, भुईमूग, वाटाणे, पेरू, अननस, कलिंगड, अक्रोड, जेवणाची थाळी अशा विविध चिन्हांचाही समावेश आहे. निवडणूक लढविणार्‍या अपक्ष उमेदवारांना तसेच अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या उमेदवारांना या मुक्त चिन्हांमधून चिन्ह निवडता येणार आहे. चिन्ह वाटपाची प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या नियम व मार्गदर्शक सूचनांनुसार पारदर्शक पध्दतीने राबविण्यात येणार आहे.
मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना त्यांच्या राखीव चिन्हांवर उमेदवार उभे करण्याची मुभा आहेेे. मुक्त चिन्हांची यादी त्यांना लागू होणार नाही. राष्ट्रीय स्तरावरील पाच, राज्यस्तरीय पाच आणि इतर राज्यांतील राज्यस्तरीय नऊ अशा एकूण 19 राजकीय पक्षांची चिन्हे राखीव ठेवण्यात आली आहेत. उर्वरित चिन्हे अपक्ष उमेदवारांना दिली जाणार आहेत.
निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर उमेदवाराचे नाव मतदारांच्या लक्षात राहीलच असे नाही. मात्र, निवडणूक चिन्ह सहज लक्षात राहते. त्यामुळे मतदारांना चिन्हावरून मतदान करणे सोपे जाते. राज्य निवडणूक आयोगाकडे अमान्यताप्राप्त पण नोंदणीकृत अशा 416 राजकीय पक्षांची नोंद आहे. त्यांना मान्यताप्राप्त पक्षांच्या राखीव चिन्हांऐवजी स्वतंत्र चिन्हे देण्यात येणार असल्याचे नागपूर महापालिकेतर्फे प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळवण्यात आले आहे.
राज्य निवडणूक आयोगाने एकूण 19 राजकीय पक्षांची चिन्हे राखीव ठेवली आहेत. अपक्ष उमेदवारांनी अर्ज भरताना किमान तीन मुक्त चिन्हांचा अग्रक्रम नमूद करणे बंधनकारक राहणार आहे. वाहनांशी संबंधित तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तूंची चिन्हेही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. येत्या 2 जानेवारी 2026 रोजी अर्ज माघारीनंतर आणि त्यानंतर 3 जानेवारीला निवडणूक चिन्हांचे वाटप स्पष्ट होणार आहे.

COMMENTS