Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शहीद जवान वैभव भोईटे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

सातारा / प्रतिनिधी : शहीद जवान वैभव संपतराव भोईटे यांच्या पार्थिवावर आज राजाळे, ता. फलटण येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी प

राष्ट्रपती रामनाथ कोविंद 7 डिसेंबर रोजी रायगडावर
औदुंबर-भुवनेश्‍वरीदरम्यान होणार झुलता पूल; झुलत्या पुलामुळे पर्यटनाला चालना
शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स 482 अंकानी घसरला तर निफ्टी 17,674 वर बंद

सातारा / प्रतिनिधी : शहीद जवान वैभव संपतराव भोईटे यांच्या पार्थिवावर आज राजाळे, ता. फलटण येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलीस दल व भारतीय सैन्य दलाच्या जवानांच्या तुकडीने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून तसेच अंतिम बिगुल वाजवून शहीद जवानास मानवंदना दिली.

यावेळी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ. दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, प्रांताधिकारी सचिन ढोले, पोलीस उपअधीक्षक राहुल धस, तहसीलदार डॉ. अभिजित जाधव, गटविकास अधिकारी भरत बोडरे, बीड जिल्हा कारागृह अधीक्षक विलास भोईटे, पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, माजी सनदी अधिकारी विश्‍वासराव भोसले, राजाळेच्या सरपंच स्वाती दौंदे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भाऊसाहेब काळे यांनी शहीद जवान वैभव भोईटे यांना पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली.
शहीद वैभव भोईटे यांचे वडील संपतराव भोईटे यांनी पार्थिवाला मुखअग्नी देऊन अंत्यसंस्कार केले. यावेळी लष्कराचे विविध आजी, माजी अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
लडाख येथे देशसेवा बजावत असताना झालेल्या अपघातात वैभव भोईटे शहीद झाले. त्यांच्या पश्‍चात आई, वडील, पती, पत्नी व एक मुलगी असा त्यांचा परिवार आहे.

COMMENTS