Homeताज्या बातम्या

रेस्क्यू वाहनाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते वन विभागास लोकार्पण

अकोले : जिल्ह्यातील वाढता बिबट मानव संघर्ष प्रभावीपणे हाताळण्यासाठी वनविभागास जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या रेस्क्यू व

भाजपने पोलिस बळाचा वापर करून शिवसेना फोडली : महेश तपासे
गुहा येथे कार व बसची समोरासमोर धडक ; चार ठार
“फडणवीस…! डबक्यात बेंडुक असतात, त्यात उतरू नका” | LOK News 24

अकोले : जिल्ह्यातील वाढता बिबट मानव संघर्ष प्रभावीपणे हाताळण्यासाठी वनविभागास जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या रेस्क्यू वाहनांचे राजूर वनविभागास प्रातिनिधिक स्वरूपात जलसंपदा तथा पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते निळवंडे येथे वाटप करण्यात आले.
जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी १४ रेस्क्यू वाहनांना मंजुरी दिली होती.
निळवंडे येथे कार्यक्रमात अकोले येथील वनक्षेत्रपाल यांना वाहनाची चावी सुपूर्द करून वाहन प्रदान करण्यात आले. माजी आमदार वैभव पिचड यांनी या वाहनाची पूजा केली. आमदार अमोल खताळ, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, सहायक वनसंरक्षक अमरजीत पवार, वनक्षेत्रपाल डी. डी. पड वळे, प्रकाश डोंगरे, वनपाल वाय. आर. डोंगरे व कर्मचारी आणि अधिकारी उपस्थित होते.

COMMENTS