Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुतळा परिसरातील स्वच्छता न झाल्यास आंदोलन

सातारा / प्रतिनिधी : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर नियमित स्वच्छता करणेबाबत उपमुख्याधिकारी अ‍ॅड. अरविंद दामले यांच्याकडे तक्रार केल्य

टेंभूच्या पाणी योजनातून हजारो हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार; आगामी काळात प्रभाकर देशमुखांच्या नेतृत्वाखाली माण-खटावचे प्रश्‍न मार्गी लावणार : ना. अजित पवार
सातार्‍यात सरन्यायाधीश गवई यांच्या समर्थनार्थ संविधान संघर्ष मोर्चा
सातार्‍यात सापडली गुप्त होणारी मानवी कवटी; जिल्हा रुग्णालयातील अधिकार्‍यांना डोकेदुखी

सातारा / प्रतिनिधी : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर नियमित स्वच्छता करणेबाबत उपमुख्याधिकारी अ‍ॅड. अरविंद दामले यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी तातडीने प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. तेंव्हा नियमित स्वच्छता झाली पाहिजे. अन्यथा, आंदोलन केले जाईल, असाही इशारा धम्मबांधवांनी पालिका प्रशासनास दिला.
पालिका निवडणुकीची धामधूम सुरू झाल्यापासून पुतळा परिसर व समोरची बाजू नियमित स्वच्छ केला जात नाही. शिवाय, बागही सुकत चालली आहे. याबाबत अ‍ॅड. अरविंद दामलेसह कार्यकर्ते व पत्रकार यांनी परिसरात फिरून माहिती घेतली. विशेष म्हणजे पुतळा रोजच स्वच्छ केला जातो. त्या कर्मचार्‍यांचे धम्मबांधव यांनी सत्कार केला होता. त्यांच्या कामाबद्दल कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
रोजच अनुयायी पुतळा परिसरात येत असतात. अक्षरशः स्वतः कार्यकर्ते हातात झाडू घेऊन साफसफाई करत आहेत. पाणीही घालण्याचे काम करतात. मग पालिकेने ज्यांना काम दिले आहे ते काय करतात? तेंव्हा याबाबत सखोल चौकशी करून कोणती कामे कोणाला आहेत? याबाबतही संबंधितांना आठवण करून द्यावी. नियमित स्वच्छता करून बागेतील झाडांनाही पाणी घालावे, अशी माफक अपेक्षा आहे. जर यापुढे दुजाभाव अथवा हयगय आढळून आली तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल. असाही अंतिम इशारा उपमुख्यकार्यकारी अधिकारी अ‍ॅड. अरविंद दामले यांच्यासमोर पुतळा परिसरातच देण्यात आला आहे.

COMMENTS