अहिल्यानगर : महावितरणच्या २०२५-२६ वर्षातील राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा नुकत्याच अमरावती येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या. या स्पर्धेत पुणे-ब
अहिल्यानगर : महावितरणच्या २०२५-२६ वर्षातील राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा नुकत्याच अमरावती येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या. या स्पर्धेत पुणे-बारामती परिमंडळाने उत्कृष्ट कामगिरी करत सर्वसाधारण अजिंक्यपद पटकावले. नाशिक-जळगाव परिमंडळाच्या खेळाडूंनीही उल्लेखनीय कामगिरी करीत महिला खो-खो स्पर्धेत उपविजेतेपद मिळविले, तर वैयक्तिक क्रीडा प्रकारात ८ सुवर्ण व ७ रौप्य अशी एकूण १५ पदकांची खेळाडूंनी लक्षणीय कमाई केली. या यशस्वी कामगिरीचा गौरव करण्याकरिता आज सोमवारी नाशिक परिमंडळ कार्यालयात मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांच्या उपस्थितीत खेळांडूचा विशेष सन्मान समारंभ आयोजित करण्यात आला. खेळाडूंशी त्यांच्या अनुभवांची चर्चा करत श्री. लटपटे यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले तसेच भविष्यात आणखी मोठी कामगिरी करण्यासाठी शुभेच्छा दिल्या .
अमरावती येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या क्रीडा संकुलात दि. १२ ते १५ नोव्हेंबर दरम्यान चार दिवसीय राज्यस्तरीय स्पर्धा संपन्न झाल्या. समारोप प्रसंगी महावितरणचे संचालक श्री. सचिन तालेवार (संचालन/प्रकल्प) व श्री. राजेंद्र पवार (मानव संसाधन) यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंनी पुरस्कार स्वीकारले. या निमित्ताने विद्युत भवन येथे आयोजित सन्मान कार्यक्रमास सहाय्यक महाव्यवस्थापक चंद्रकांत खाडे, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी प्रमोद राजेभोसले, कार्यकारी अभियंता चेतन वाडे व नंदकिशोर काळे, जनसंपर्क अधिकारी विकास आढे तसेच अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

COMMENTS