Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

’उरुण-ईश्‍वरपूर नामांतरणास राज्य शासनाची मंजुरी: शासकीय अध्यादेश निघाला : शहरात जल्लोष

इस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूर शहराचे ईश्‍वरपूर असे नामकरण करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिल्यानंतर आता उरुण वासीयांच्या मागणीनुसार राज्य सरकारने

लोणंद मधील नव्या पाण्याच्या टाकीचे उदघाटन कुणासाठी थांबलय?
महिला शिक्षकांना त्रास देणार्‍या गटशिक्षणाधिकार्‍यांवर कारवाई करावी : नंदकुमार गोडसे
नगरविकास आराखड्या विरोधात मेढ्यात शेतकर्‍यांचे आंदोलन; प्रास्तावित आराखडयाची होळी

इस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूर शहराचे ईश्‍वरपूर असे नामकरण करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिल्यानंतर आता उरुण वासीयांच्या मागणीनुसार राज्य सरकारने उरुण ईश्‍वरपुर नगरपरिषद असे नामांतरण केले आहे. मंगळवारी तसा शासकीय अध्यादेश काढण्यात आला आहे. ही माहिती आ. सदाभाऊ खोत यांनी दिली. शासन निर्णय निघतात शहरात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पेढे वाटून जल्लोष साजरा केला. पालिका निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याने नामांतरणाच्या वादावर पडदा पडला आहे.
इस्लामपूर शहराचे नाव बदलून ईश्‍वरपूर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. 15 दिवसापूर्वी या निर्णयाला केंद्र सरकारनेही मंजुरी दिली होती. शहराचे नामांतरण करताना त्यामध्ये उरूण असा उल्लेख व्हावा, अशी मागणी उरुणवासियांनी केली होती. त्यासाठी माजी पोलीस पाटील बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली महिनाभर साखळी उपोषण करण्यात आले होते. शहरवासीयांच्या भावना लक्षात घेऊन आ. सदाभाऊ खोत, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख आनंदराव पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे उरुण ईश्‍वरपूर असे सुधारित नामकरण करण्याची मागणी केली होती. आ. सदाभाऊ खोत यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. पालिका निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्य सरकारने मंगळवारी सुधारित नामांतरणाचा अध्यादेश काढला.
अधिकृतपणे उरूण ईश्‍वरपुर नगरपरिषद अशी अधिसूचना निघाल्यानंतर गांधी चौक येथे भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी करत, पेढे वाटून तसेच शहरातून रॅली काढत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी सांगली जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडीक माजी नगरसेवक कपिल ओसवाल, सतीश महाडीक, अमित ओसवाल, सुजित थोरात, सत्यवान रासकर, अमोल ठाणेकर, गजानन फल्ले, अमीर हवालदार, दिनेश पोरवाल, कल्पेश पोरवाल व कार्यकर्ते, व्यापारी उपस्थित होते.

COMMENTS