Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्हा स्काऊट सहाय्यक आयुक्तपदी प्रमोद तोरणे

श्रीरामपूर: भिंगार येथील श्रीमती ॲबट मायादेवी गुरुदित्ताशाह हायस्कूल व ज्युनिअर आर्टस् कॉलेजचे प्राचार्य व उत्तर विभागाचे सहाय्यक विभागीय अधिकारी

लातूर जिल्ह्यात मोतिबिंदुच्या 23506 शस्त्रक्रिया
श्री गणेश कारखान्याच्या कर्जाला मंजुरी, मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार
रेशीम उद्योगातून विदर्भातील शेतकऱ्यांची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल : मुख्यमंत्री फडणवीस
Displaying IMG_20251018_133221.jpg

श्रीरामपूर: भिंगार येथील श्रीमती ॲबट मायादेवी गुरुदित्ताशाह हायस्कूल व ज्युनिअर आर्टस् कॉलेजचे प्राचार्य व उत्तर विभागाचे सहाय्यक विभागीय अधिकारी प्रमोद तोरणे यांची अहिल्यानगर जिल्हा स्काऊट गाईडच्या सहाय्यक आयुक्तपदी निवड करण्यात आली आहे. तशा आशयाचे पत्र जिल्हा संघटक पेशकार साहेब यांनी तोरणे यांना नुकतेच दिले आहे.                 

देशप्रेम, संस्कार, श्रमप्रतिष्ठा, शिस्त, स्वावलंबन विदयार्थ्यांनी अंगी बाणले पाहिजे, स्काऊट चळवळ वाढली पाहिजे या दृष्टीने या निवडी केल्या आहेत. या निवडीने जबाबदारी वाढली तरी स्काऊट चळवळ जोमदारपणे रुजविण्यासाठी अहोरात्र कष्ट घेऊ, असे मत प्रमोद तोरणे यांनी यावेळी व्यक्त केले.  प्रमोद तोरणे यांच्या निवडीबद्दल उत्तर विभागीय अध्यक्ष, आमदार आशुतोष काळे, व्हाईस् चेअरमन भगीरथ शिंदे, मॅनेजिंग सदस्य दादाभाऊ कळमकर, मीनाताई जगधने, राहुल जगताप, उपाध्यक्ष अरुण कडू पाटील, जनरल बॉडी सदस्य रावसाहेब म्हस्के पाटील, रितू दीदी अँबट, ज्ञानदेव पांडुळे, मनोज कवडे अशोक बाबर, विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे, सहाय्यक विभागीय अधिकारी बाबासाहेब नाईकवाडी, गुणवत्ता कक्ष मार्गदर्शक काकासाहेब वाळुंजकर, उत्तर विभागीय कार्यालयीन सर्व सेवक आदीसह उत्तर विभागातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालक यांनी अभिनंदन केले आहे.

COMMENTS