Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एसएमबीटी वैद्यकीय महाविद्यालयास  नॅकचे ‘ए’ ग्रेड मानांकन

इगतपुरी : एसएमबीटी सेवाभावी ट्रस्टचे एसएमबीटी मेडिकल सायन्सेस अण्ड रिसर्च सेंटर (SMBT IMSRC) या वैद्यकीय महाविद्यालयास  राष्ट्रीय मूल्यांकन आणि म

विठ्ठल-रुक्मिणी पूजेची आता घरबसल्या बुकिंग
स्वाभिमानीचे एकला चलो रे
उन्हाचा पारा वाढला, टोप्यांना व गंमच्यांना सर्वाधिक मागणी
Displaying WhatsApp Image 2025-11-05 at 3.31.31 PM.jpeg

इगतपुरी : एसएमबीटी सेवाभावी ट्रस्टचे एसएमबीटी मेडिकल सायन्सेस अण्ड रिसर्च सेंटर (SMBT IMSRC) या वैद्यकीय महाविद्यालयास  राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद (नॅक)कडून ‘अ’ दर्जा (NAAC- A Grade)  मानांकन प्राप्त झाले.नॅकने नुकतेच मूल्यांकन करून हे मानांकन बहाल केले.  पहिल्याच फेरीत (First Cycle) अशा प्रकारचे मानांकन मिळविणाऱ्या देशातील मोजक्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आता एसएमबीटी वैद्यकीय महाविद्यालयाची गणना होत आहे. या मानांकनामुळे महाराष्ट्रातील  मूल्याधिष्ठित वैद्यकीय शिक्षण तसेच सर्वसामान्यांना परवडणारी गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा देणारी एक अग्रगण्य व विश्वसनीय संस्था म्हणून एसएमबीटी वैद्यकीय महाविद्यालय प्रभावीपणे अधोरेखित झाले आहे.

राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेच्या त्रिसदस्यीय  समितीने दि. ८ व ९ ऑक्टोबर २०२५ रोजी इगतपुरी तालुक्यातील नंदी हिल्स येथील एसएमबीटी वैद्यकीय महाविद्यालयातील पायाभूत सेवा-सुविधांसह  वैद्यकीय शिक्षण व विविध उपचार पद्धती यासाठी आवश्यक अत्याधुनिक उपकरणांची उपलब्धता, वैद्यकीय शिक्षण शाखेतील पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सर्वांगीण गुणवत्ता विकासासाठी केलेले कार्य, प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी केलेले विविध प्रकारचे संशोधन व नाविन्यपूर्ण उपक्रमांचा सखोल आढावा घेतला.

COMMENTS