Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

फिरोदिया अखिल भारतीय खुल्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेचे उत्साहात शुभारंभ

अहिल्यानगर : शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन प्रायोजित व अहिल्यानगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या वतीने आयोजित अखिल भारतीय खुली आंतरराष्ट्री

कुंडलवाडीत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे पथसंचलन; शांतता राखण्याचे आवाहन
राज्यातील प्रत्येक माणूस सुखी, समाधानी, आनंदी होऊ दे ! : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भीमाशंकरचरणी प्रार्थना
हिंगोलीत भगरीमुळे 100 जणांना विषबाधा
Displaying DSC_7698.JPG

अहिल्यानगर : शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन प्रायोजित व अहिल्यानगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या वतीने आयोजित अखिल भारतीय खुली आंतरराष्ट्रीय मानांकित बुद्धिबळ स्पर्धा अहिल्यानगर येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय, स्टेशन रोड येथे उत्साहात सुरू झाली. या बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते अनुप देशमुख यांच्या हस्ते बुद्धिबळ पटावर चाल देऊन करण्यात आले.या वेळी बुद्धिबळ संघटनेचे सचिव यशवंत बापट, खजिनदार सुबोध ठोंबरे, विश्वस्त शाम कांबळे, पारुनाथ ढोकळे, प्रकाश गुजराथी, स्वप्निल भंगुरकर, नवनीत कोठारी, दत्ता घाडगे, रोहित आडकर, देवेंद्र ढोकळे, सुनील जोशी, संजय खडके, अनुराधा बापट, रोहिणी आडकर तसेच पंच विनिता श्रोत्री (पुणे), श्रद्धा वीचवेकर (पुणे), पवन राठी (सोलापूर), शार्दुल टापसे (सातारा), शिरीष इंदुरकर (नागपूर), विजय चोरडिया (पुणे), प्रवीण जोशी (संभाजीनगर) यांच्यासह खेळाडू, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पर्धेचे प्रस्ताविक सचिव यशवंत बापट यांनी केले. त्यांनी सांगितले की या स्पर्धेत देशभरातील खेळाडू सहभागी झाले आहेत. आतापर्यंत अहिल्यानगर, पुणे, मुंबई, नागपूर, ठाणे, नाशिक, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, जळगाव, जालना, वर्धा, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, चंद्रपूर, रायगड तसेच आंध्र प्रदेश, गुजरात, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, राजस्थान, उत्तर प्रदेश, तेलंगणा आणि पश्चिम बंगाल येथून मिळून २७० खेळाडूंचा सहभाग निश्चित झाला आहे.
या स्पर्धेत इंटरनॅशनल मास्टर राहुल संगमा (गुजरात), अनुप देशमुख (महाराष्ट्र) यांच्यासह अनेक दिग्गज खेळाडूंचा सहभाग आहे. त्यामुळे ही स्पर्धा दर्जेदार आणि रोमहर्षक ठरणार आहे.
या वेळी अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया म्हणाले की, शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन तर्फे आयोजित या क्लासिकल फेडरेशन चेस टूर्नामेंट २०२५ मध्ये सर्व वयोगटातील खेळाडू सहभागी होत आहेत. साडेपाच वर्षांचा सर्वात लहान बुद्धिबळपटू आणि ८३ वर्षांचे ज्येष्ठ खेळाडू या स्पर्धेत आपली बुद्धी आणि कौशल्य आजमावणार आहेत. जिल्हा बुद्धिबळ संघटनेचा मानस म्हणजेच शहरातून जास्तीत जास्त ग्रँडमास्टर घडवणे, आणि होतकरू व तरुण बुद्धिबळ खेळाडूंना प्रोत्साहन करणे. ह्या अतिशय दर्जेदार खेळाडू सहभागी झाले आहेत असे त्यांनी सांगितले.
स्पर्धेचे सूत्रसंचालन पारुनाथ ढोकळे सर यांनी केले, तर प्रकाश गुजराथी यांनी आभार मानले.
अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या या उपक्रमामुळे जिल्ह्यातील तरुण खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळणार असून, नगर जिल्हा बुद्धिबळाच्या क्षेत्रात नवे पर्व सुरू झाले असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

COMMENTS