Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नितीश कुमार फॅक्टर साधा नाही !

सत्तरीच्या च्या दशकात भारतीय राजकारणात काँग्रेसला विरोध करत ज्या समाजवादी राजकीय नेत्यांचा देशाच्या राजकीय पटलावर उदय झाला, त्यात नीतीश कुमार हे

देशाला प्रगतीपथावर पुढे नेण्यासाठी उत्तमतेवर भर द्या : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
खासदार विनायक राऊत यांचे योगदान शुन्य | LokNews24
अनियंत्रित ट्रकने 10 वाहनांना उडवले

सत्तरीच्या च्या दशकात भारतीय राजकारणात काँग्रेसला विरोध करत ज्या समाजवादी राजकीय नेत्यांचा देशाच्या राजकीय पटलावर उदय झाला, त्यात नीतीश कुमार हे एक महत्त्वाचे नेते. गेली २२ वर्षे नितेश कुमार बिहारचे जितन कुमार मांझी यांचा चार महिन्याचा अपवाद वगळला तर सातत्याने मुख्यमंत्री आहेत. अर्थात जीतन कुमार मांझी यांना स्वतः नितेश कुमार यांनीच मुख्यमंत्री बनवले होते परंतु जितेंद्र कुमार यांनी आपली स्वतंत्र कार्यक्षेली विकसित केल्याबरोबर नीतीश कुमार यांनी त्यांना मुख्यमंत्री पदावरून पाठवण्याची मोहीम यशस्वी केली होती नितीश कुमार हे बिहार मधील ओबीसी नेते तर आहेतच पण त्याचबरोबर हे समाजवादी चळवळीतून आलेले असल्यामुळे एक व्यापक विचारधारा मानणारे हे राजकीय नेते आहेत समाजवादी चळवळीतून आलेल्या राजकीय नेत्यांचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य असं की, ते समाजात वावरत असताना सामाजिक चळवळीचे नेते म्हणूनच त्यांना समाज ओळखते अशा या नितीश कुमार यांचे कर्तृत्व सलग बावीस वर्षे बिहारचे मुख्यमंत्री असण्याचा उपक्रम आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या तब्येतीच्या चर्चा पेरल्या जात असल्या तरी नितीश कुमार अद्यापही राजकारणासाठी फिट आहेत. अर्थात, त्यांनी दिलेल्या उमेदवार यादी वरून असा तर्क काढणे, हे देखील थोडंसं कठीण आहे. कारण २०२० च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी आपल्या पक्षातर्फे वीस मुस्लिम लोकांना उमेदवारी दिली होती. यावेळी त्यांनी १०१ उमेदवारांमध्ये केवळ चार लोकांना उमेदवारी दिली आहे. याउलट, प्रशांत किशोर यांनी मुस्लिम क्षेत्रातील २१ जणांना उमेदवारी दिली आहे. हा विरोधाभास पाहता, पक्षांतर्गत नितिश कुमार यांची पकड काहीशी ढिली झाली, असं वाटत असलं, तरीही ते अद्याप मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहेत. त्यामुळे, आगामी विधानसभा निवडणुकीत एनडीएचा विजय झाला तर, मुख्यमंत्री पदाचे नितिश कुमार हेच दावेदार आहेत. परंतु, देशाचे गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते अमित शहा यांनी एक धक्कादायक विधान केले आहे. या विधानामुळे एकूणच राजकीय पटलावर खळबळ उडाली असून, हे विधान धक्का तंत्राचे मानलं जात आहे. अमित शहा यांनी केलेले विधान असं आहे की, पत्रकारांनी  प्रश्न विचारला, विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदासाठी नितिश कुमार यांचीच नियुक्ती करणार का? यावर त्यांनी म्हटले की, मी कोणाची मुख्यमंत्री पदासाठी निवडणूक करणारा कोण? असा प्रश्नार्थक उत्तराचा भाग सादर करून,  बिहारच्या आगामी विधानसभा निवडणूकीनंतर नितीश कुमार हे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतच नाही; असा एक मतितार्थ त्यांच्या विधानातून घेतला जात आहे! या संदर्भात त्यांनी पुढील वाक्य किंवा विधान करताना हे देखील म्हटले की, आम्ही एनडीएच्या घटक दलांसोबत ही निवडणूक लढतो आहोत. त्यामुळे आमच्या सोबत अनेक पक्ष आहेत. त्यामुळे या सगळ्या पक्षांचे नेते मिळून आम्ही एकत्रित बसून आणि त्यानंतर राज्याचा मुख्यमंत्री ठरवू,अर्थात बिहारच्या निवडणुकीत ही आवश्यंभावी वस्तुस्थिती आहे की, तेथे कुठल्याही परिस्थितीत मुख्यमंत्री हा मागासवर्गीयच लागेल. कारण, बिहारचे राजकारण हे समाजवादी आणि डाव्या चळवळींच्या पार्श्वभूमीवर उभे आहे. त्यामुळे तिथे जातिगत राजकारणाचा भाग हा प्रमुख आहे. बिहार च्या राजकारणात आलेला हा बदल लोकांच्या नजरेतून सुटणारा नाही. नितीश कुमार यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित न केल्यास एनडीएला त्याचा काहितरी प्रमाणात निश्चितपणे फटका बसेल. कुर्मी आणि कुशवाहा यांचे राजकीय विभक्तीकरण करण्याचा डावपेच केला जात असला तरी, त्यात वाढलेले वाटेकरी खूप अधिक प्रमाणात आहेत. शिवाय, नितिश कुमार हे चाणाक्ष राजकारणी आहेत. लालूप्रसाद यादव आणि त्यांच्यात विस्तव जात नसेल तरी, ऐनवेळी आतून नितीश कुमार तेजस्वी यादव यांच्यामागे शक्ती उभी करू शकतात.

COMMENTS