Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉक्टरांच्या प्रिस्क्रिशनशिवाय ‘कफ सिरप’ची विक्री केल्यास मेडिकलला टाळे

पुणे : मध्य प्रदेशात खोकल्याच्या औषधांमुळे (कफ सिरप) बालकांचा मृत्यू झाल्यानंतर राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाची तपासणी मोहीम सुरू आहे. डॉक्टर

उमेदवारी अर्ज पहिला कोण घेणार?…टॉसवर झाला निर्णय ; मनपा पतसंस्थेची निवडणूक पहिल्या दिवसापासून चर्चेत
ज्येष्ठांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष; आंदोलनाचा इशारा; कर्जत तहसीलवर मोर्चा; १९ मागण्यांसाठी ‘वंचित’चा आवाज
वाहतूकदारांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य : उर्मिला पवार

पुणे : मध्य प्रदेशात खोकल्याच्या औषधांमुळे (कफ सिरप) बालकांचा मृत्यू झाल्यानंतर राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाची तपासणी मोहीम सुरू आहे. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय (प्रिस्क्रिप्शन) खोकल्याच्या औषधांची विक्री करणार्‍या विक्रेत्यांची तपासणी मोहीम विभागाने आता हाती घेतली आहे. या मोहिमेत गुरुवारी पहिल्याच दिवशी पुणे विभागात 20 औषध विक्रेत्यांवर कारवाई करून त्यांची दुकाने (मेडिकल) बंद करण्यात आली. औषध विक्रेत्यांकडून डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधांची विक्री सर्रास होत असल्याचे चित्र आहे. आता मध्य प्रदेशात खोकल्याच्या औषधांमुळे बालकांचा मृत्यू झाल्याने यातील धोका समोर आला आहे. या पार्श्‍वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाच्या पुणे विभागाने डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधांची विक्री करणार्‍या औषध विक्रेत्यांची तपासणी मोहीम सुरू केली.

COMMENTS