उमेदवारी अर्ज पहिला कोण घेणार?…टॉसवर झाला निर्णय ; मनपा पतसंस्थेची निवडणूक पहिल्या दिवसापासून चर्चेत

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उमेदवारी अर्ज पहिला कोण घेणार?…टॉसवर झाला निर्णय ; मनपा पतसंस्थेची निवडणूक पहिल्या दिवसापासून चर्चेत

अहमदनगर/प्रतिनिधी : जिल्ह्यातील कोणत्याही निवडणुका नेहमीच रंगतदार होतात. पण पहिल्याच दिवसापासून रंगतदार ठरणारी मनपा कर्मचारी पतसंस्थेची निवडणूक पहिली

नगरपालिका वाचनालयात डॉ. हेडगेवार यांची जयंती उत्साहात
दिल्ली विमानतळावर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी l DAINIK LOKMNTHAN
चांदबिबी महालच्या परिसरात पुन्हा आढळला बिबट्याचा वावर

अहमदनगर/प्रतिनिधी : जिल्ह्यातील कोणत्याही निवडणुका नेहमीच रंगतदार होतात. पण पहिल्याच दिवसापासून रंगतदार ठरणारी मनपा कर्मचारी पतसंस्थेची निवडणूक पहिलीच ठरणार आहे. निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर कोरा उमेदवारी अर्ज पहिला कोणी घ्यायचा, यावरून वाद झाले व चक्क नाणेफेक (टॉस) करून निर्णय झाला. यात महिलेने बाजी मारली व पहिला अर्ज घेतला. पण ज्यांच्यात हा वाद झाला, ते दोन्ही एका पॅनेलचे उमेदवार असल्याने हा टॉसचा निर्णय त्यांच्या गोटासह सहकार क्षेत्रातही हसू फुलवून गेला.
महापालिका पतसंस्थेच्या 15 जागांसाठी सोमवारपासून (15 नोव्हेंबर) कोरे उमेदवारी अर्ज विक्री व माहिती भरलेले उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया जिल्हा सहकार उपनिबंधक कार्यालयाद्वारे सुरू झाली. 22 नोव्हेंबरपर्यंत ती सुरू राहणार आहे. पण महापालिकेच्या राजकीय पदाधिकार्‍यांच्या सर्व निवडणुका जशा चुरशीने होतात, तोच वारसा कर्मचार्‍यांच्या पतसंस्था निवडणुकीत चुरशीने जपला जातो. कैलास भोसलेंच्या नेतृत्वाखालील जनसेवा पॅनेल व बाबासाहेब मुदगल यांचे सहकार पॅनेल अशी जोरदार लढत मागच्यावेळी झाली आहे. तिची पुनरावृत्ती यंदाही अपेक्षित आहे. या निवडणुकीत पहिल्याच दिवशी चक्क 21 उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने याची चुणूकही दिसली आहे. पण यापेक्षा विशेष घटना म्हणजे पहिला कोरा अर्ज कोणी घ्यायचा, याचा निर्णय चक्क टॉस करून घ्यावा लागला.

सव्वा नऊलाच सारे हजर
मनपा पतसंस्थेची निवडणूक प्रक्रिया सोमवारपासून सुरू होत असल्याने या पहिल्याच दिवशी सकाळी सव्वा नऊ वाजताच निवडणूक लढवू इच्छिणारे 25-30जण जिल्हा सहकार उपनिबंधक कार्यालयासमोर येऊन थांबले. हे कार्यालय सकाळी 10 वाजता उघडल्यावर दार लोटून सारे निवडणूक अधिकार्‍यांसमोर येऊन ठाकले. आम्ही आधी आलो, आम्हालाच पहिला कोरा अर्ज मिळाला पाहिजे, असा वाद सुरू झाला. हा अनोखा वाद या कार्यालयातील सार्‍यांनाच अचंबित करून गेला. त्यातून मार्ग निघत नसल्याने अखेर पहिला अर्ज कोणाला याचा निर्णय नाणेफेकीतून घेतला गेला. नंदा भिंगारदिवे व बाबासाहेब राशीनकर यांच्या या टॉसमध्ये भिंगारदिवेंनी बाजी मारली व नाणेफेक जिंकून त्यांनी मानाचा पहिला कोरा अर्ज छापमध्ये घेतला व काही वेळात भरूनही दिला. पण पहिला कोरा अर्ज कोण घेतो, यासाठीची ही अनोेखी नाणेफेक मात्र चर्चेत आली व ऐकणारांमध्ये हसूही फुलवून गेली.

पहिल्याच दिवशी 21 अर्ज दाखल
मनपा पतसंस्था निवडणुकीत पहिल्याच दिवशी 21 अर्ज काही वेळातच दाखल झाले. कोर्‍या अर्जाची किंमत 100 रुपये आहे. पहिल्या दिवशी 76 अर्ज विकले गेले व त्यापैकी 21 माहिती भरून दाखलही झाले. यात बाबासाहेब मुदगल, बाळासाहेब पवार, कैलास भोसले, विकास गीते, अजय कांबळे, अशोक कराळे, महादेव कोतकर, विजय कोतकर, राजू शेख, बाळू विधाते, बलराम गायकवाड, सोमनाथ सोनवणे, कैलास चावरे तसेच राहुल साबळे, नंदा भिंगारदिवे, भीमाबाई काळे, प्रसाद उमाप, गुलाब गाडे, बाबासाहेब राशीनकर व बाळासाहेब गंगेकर यांचा समावेश आहे. दरम्यान, जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्था निवडणुकीत पहिल्या दिवशी 4 कोरे अर्ज विकले गेले. उमेदवारी मात्र कोणाचीही दाखल झाली नाही.

COMMENTS