Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

औंध संगीत महोत्सव शनिवारी यंदाचा 85 वा महोत्सव

औंध / वार्ताहर : शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठानतर्फे औंध (ता. खटाव, जि. सातारा) येथे आयोजित केला जाणारा ’औंध संगीत महोत्सव’ यंदा शनिवार, दि. 11 ऑक्ट

वडोलीत शेतात वीज पडून बैल ठार
क्रांतिवीर शैक्षणिक संकुलाची प्रवेशोत्सव फेरी उत्साहात
मोबाईल कंपनीकडून कुडाळ ग्रामपंचायतीला एक लाख नव्वद हजार पाचशे रुपायाची भरपाई

औंध / वार्ताहर : शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठानतर्फे औंध (ता. खटाव, जि. सातारा) येथे आयोजित केला जाणारा ’औंध संगीत महोत्सव’ यंदा शनिवार, दि. 11 ऑक्टोंबर रोजी होत आहे. यंदाचा हा 85 वा महोत्सव आहे. हा महोत्सव भारतातील महत्वाच्या महोत्सवांपैकी एक असून या संगीत महोत्सवाची सुरुवात सन 1940 मध्ये त्या वेळच्या औंध संस्थानचे दरबार गायक व ग्वाल्हेर घराण्याचे बुजुर्ग गायक व गुरू गायनाचार्य पं. अनंत मनोहर जोशी उर्फ अंतुबुवा व त्यांचे चिरंजीव ज्येष्ठ गायक आणि व्हायोलिन वादक पं. गजानन बुवा जोशी या पितापुत्रांनी केली. पुढे या महोत्सवाचे स्वरूप वाढत गेले आणि सन 1981 मध्ये पं. गजानन बुवा जोशी यांच्या अध्यक्षतेखाली ’शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठान’ या संस्थेची स्थापना करण्यात आली. तेंव्हापासून या संस्थेतर्फे औंध संगीत महोत्सवाचे आयोजन होत आहे. 84 वर्षे अव्याहतपणे साजरा केल्या जाणार्‍या या संगीत महोत्सवात पं. जितेंद्र अभिषेकी, पं. भीमसेन जोशी, श्रीमती रोहिणी भाटे, गिरिजादेवी, पंडित के.जी. गिंडे, सुलतान खाँसाहेब, पं. मधुकर जोशी, पद्मश्री पं. उल्हास कशाळकर, पद्मश्री पं. सुरेश तळवलकर, यशवंत बुवा जोशी, अश्‍विनी भिडे-देशपांडे, योगेश समसी, पं. वेंकटेश कुमार, निलाद्रीकुमार, शुभा मुद्गल अशा अनेक ज्येष्ठ व श्रेष्ठ कलाकारांनी आपली कला आजवर सादर केली आहे. औंधच्या कलाप्रेमी राजघराण्याचा आशीर्वाद देखील पहिल्यापासून या महोत्सवास लाभला आहे.
महोत्सव तीन सत्रांमध्ये सादर होईल. सकाळी 8.45 वाजता माननीय गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या हस्ते, तसेच प्रशासक / ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत औंध आदी मान्यवरांच्या उपस्थितीत महोत्सवाचे विधिवत उदघाटन होईल.
प्रथम सत्राची सुरुवात पं. गजानन बुवा जोशी यांच्या नाती आणि ग्वाल्हेर घराण्याच्या गायिका अपूर्वा गोखले आणि पल्लवी जोशी यांच्या सहगायनाने होईल. त्यानंतर अभिषेक बोरकर यांचे सरोद वादन सादर होईल. त्यानंतर राजेंद्र अंतरकर यांचे तबला वादन सादर होईल. प्रथम सत्राची सांगता अमिता पावगी-गोखले यांच्या गायनाने होईल.
दुपारी 2.30 वाजता द्वितीय सत्राची सुरुवात पं. राम मराठे यांची नात प्राजक्ता मराठे यांच्या गायनाने होईल. त्यानंतर ज्येष्ठ संवादिनी वादक सुधीर नायक यांच्या संवादिनी वादनाचा आनंद श्रोत्यांना घेता येईल.
यानंतर औंध संगीत महोत्सवानिमित्त प्रकाशित केल्या जाणार्‍या ’रियाझ’ या स्मरणिकेचा प्रकाशन सोहळा संध्याकाळी 4 वाजता संपन्न होईल. स्मरणिकेचे प्रकाशन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते तसेच प्रशासक/ ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत औंध आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत होईल. त्यानंतर आग्रा घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. अरुण कशाळकर यांच्या गायनाचा आनंद श्रोत्यांना घेता येईल. यानंतर अनन्या गोवित्रीकर यांच्या कथक नृत्याने द्वितीय सत्राची सांगता होईल.

COMMENTS