इस्लामपूर / प्रतिनिधी : महालक्ष्मी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे विद्यार्थी एकत्र येऊन ऐतिहासिक पन्हाळा किल्ल्यावर स्वच्छता मोहीम हाती घेतली. या

इस्लामपूर / प्रतिनिधी : महालक्ष्मी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे विद्यार्थी एकत्र येऊन ऐतिहासिक पन्हाळा किल्ल्यावर स्वच्छता मोहीम हाती घेतली. या मोहिमेत विद्यार्थ्यांनी किल्ल्याच्या परिसरातील प्लास्टिक, पिशव्या, बाटल्या व इतर कचरा गोळा करून परिसर स्वच्छ केला.
विद्यार्थ्यांनी या उपक्रमातून पर्यावरण संरक्षण, स्वच्छता आणि ऐतिहासिक वारसा जपण्याचा संदेश दिला. स्वच्छतेसोबत त्यांनी किल्ल्यावर आलेल्या पर्यटकांना कचरा न फेकण्याचे आवाहन केले. समाज हितासाठी काम करण्याची प्रेरणा तरुणाईने देत सर्वांना एक सकारात्मक संदेश दिला. याप्रसंगी प्राचार्य आदर्श पाटील, सचिन दळवी, सुनील पाटील, विजय पाटील स्वप्नील पाटील, शुभम सकटे, सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

COMMENTS