दहिवडी / प्रतिनिधी : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनद्वारे खेळवल्या जाणार्या आमंत्रित लीग स्पर्धेसाठी सातारा जिल्हा क्रिकेट असोसिएशने 14 वर्षा खाल

दहिवडी / प्रतिनिधी : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनद्वारे खेळवल्या जाणार्या आमंत्रित लीग स्पर्धेसाठी सातारा जिल्हा क्रिकेट असोसिएशने 14 वर्षा खालील मुलांची टीमची घोषणा केली आली असून कर्णधारपदी अर्जुन पाटील तर उपकर्णधारपदी संग्राम पोपट बनसोडे-पाटील यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन लीग स्पर्धेसाठी सातारा जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे
या स्पर्धेसाठी कर्णधार म्हणून अर्जुन पाटील तर उपकर्णधारपदी संग्राम पोपट बनसोडे-पाटील यांची निवड झाली. तसेच कौशल पराडकर, स्वराज ढेकळे, हर्षल टिळेकर, सबुध्द गायकवाड, (विकेट कीपर) सोहम सुतार, गौरेश पाटणकर, वंश शहा, वेदांत घाडगे, अवनीश गायकवाड, साईराज वाघमारे, मोहम्मदअसद शेख, वीर संदीप बोराटे, नील कांबळे अशी 15 जणांची टीम निवडण्यात आली. संभाव्य खेळाडू म्हणून ऋषिकेश सावंत, समद मुलानी, वरद पाटील, स्वरूप धुमाळ, संचित चावरे या पाच खेळाडूंचीही निवड जाहीर करण्यात आली आहे. या निवडी सातारा जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे चेअरमन विनोद वांद्रे, सिलेक्टर रणजीत चव्हाण, शेखर पवार, किशोर सकपाळ, सेक्रेटरी इरशाद बागवान यांनी केल्या आहेत.

COMMENTS