Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मराठा सोयरीकचे १०० मेळाव्यांचे शतक खुप कौतुकास्पद : शशिकांत गाडे

अहिल्यानगर : मराठा सोयरीक संस्थेने आज १०० वा मोफत वधु वर परिचय मेळावा घेऊन १०० मेळाव्यांचे शतक पूर्ण केले आहे, ही गोष्ट खूप कौतुकास्पद आहे असे उद

काँग्रेसचे बंडखोर उमेदवार बाजीराव खाडेंचे निलंबन
अपात्र लाडक्या बहिणींची संख्या 9 लाखांवर ; लाडक्या बहिणींना ई-केवायसी बंधनकारक
रेल्वेने चिरडल्याने अकरा प्रवाशांचा मृत्यू ; आगीच्या भीतीने प्रवाशांनी मारल्या उड्या
Displaying IMG-20251005-WA0055.jpg

अहिल्यानगर : मराठा सोयरीक संस्थेने आज १०० वा मोफत वधु वर परिचय मेळावा घेऊन १०० मेळाव्यांचे शतक पूर्ण केले आहे, ही गोष्ट खूप कौतुकास्पद आहे असे उद्गार अहिल्यानगर शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे सर यांनी मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी काढले.

     अखंड मराठा समाज व मराठा सोयरीक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १०० वा मोफत मराठा वधु वर परिचय मेळावा नगर शहरात हॉटेल यश ग्रँड येथे मोठ्या उत्साह मध्ये पार पडला. या मेळावा मध्ये संस्थेने तयार केलेल्या अत्याधुनिक अशा वेबसाईट व मोबाईल ॲपचे उद्घाटन प्रसिद्ध रीलस्टार सनी सकट व जान्हवी लटके यांच्या हस्ते करण्यात आले. मेळाव्यासाठी रमाकांत नाना गाडे, महेश गाडे, सिन्नरमधील प्राध्यापक राजाराम मुंगसे,  संचालिका जयश्री कुटे, पारुनाथ ढोकळे, उद्योजक शरद ठाणगे, मधुकर निकम, हरिश्चंद्र दळवी, सयाजी निमसे,गोरक्षनाथ पटारे, मनोज सोनवणे, शशिकांत भांबरे, शांतीलाल कोहक, अनिल अकोलकर, प्रमोद झावरे, प्रा. योगेश कोतकर, संगीता ठुबे, मंदा कोतकर  इत्यादी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

       आज काल एक लग्न जमवणे म्हणजे खूप अवघड असते, अशावेळी अशोक कुटे सर व त्यांच्या टीमने 5000 पेक्षा जास्त लग्न जमवले व त्यामध्ये 5000 पैकी 567 लग्न हे विधवा, विदूर, घटस्फोटीत यांचे जमवले ही खूप विशेष गोष्ट आहे असे उद्गार सिन्नरचे मराठा सेवा संघ तालुका अध्यक्ष प्रा. राजाराम मुंगसे सर यांनी काढले.मेळाव्यास विविध जिल्ह्यातून वधू वर पालक उपस्थित होते. सर्वांचे बायोडाटा वाचन जयश्री कुटे यांनी केले. सूत्रसंचालन हरिश्चंद्र दळवी व आभार पारुनाथ ढोकळे सर यांनी मानले. जे मेळाव्यासाठी येऊ शकले नाहीत त्यांनी ८४५३९०२२२२ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

COMMENTS