Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बंदुकीचा धाक दाखवत पेट्रोल पंपावर दरोडा; आंबेगाव तालुक्यातील तांबडेमळा येथील घटना

प्रतिनिधी - निरगुडसर : तांबडेमळा, ता. आंबेगाव येथील ऋषी पेट्रोल पंपावर पिस्तूलचा धाक दाखवून चार चोरट्यांनी दरोडा टाकल्याची घटना घडली असून या घट

युवकांनी निवडणूक प्रक्रियेत सहभागी होवून लोकशाही बळकट करावी : शेखर सिंह
सुंदरगडावर साजरा झाला शाही दसरा
सातारच्या जिल्हा रुग्णालयात ओमिक्रॉन बाधितांसाठी अख्खा अतिदक्षता वार्ड राखीव

प्रतिनिधी – निरगुडसर : तांबडेमळा, ता. आंबेगाव येथील ऋषी पेट्रोल पंपावर पिस्तूलचा धाक दाखवून चार चोरट्यांनी दरोडा टाकल्याची घटना घडली असून या घटनेत चोरट्यांनी पेट्रोल पंपाच्या काउंटरमधील 1 लाख 90 हजार 370 रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. ही घटना दि. 3 रोजी रात्री साडेनऊ वाजलेच्या सुमारास घडली. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. याबाबत आकाश मच्छिंद्र डोके यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तांबडेमळा (ता. आंबेगाव) गावच्या हद्दीतील ऋषी पेट्रोल पंपावर रात्री 9.30 वाजताचे दरम्यान दुचाकीवरुन आलेले दोन चोरटे पेट्रोल पंपाच्या ऑफिसमध्ये घुसले तर दोघेजण बाहेर लक्ष ठेवण्यासाठी थांबले होते. आत आल्यावर चोरट्यांनी आतील कर्मचार्‍यांवर पिस्तूल रोखले. बाहेरील कर्मचार्‍याला आत नेले. पिस्तूलचा धाक दाखवून चोरट्यांनी कर्मचार्‍यांकडे पैशाची मागणी केली. घाबरलेले कर्मचारी हात वर करून उभे राहिले. त्यावेळी त्यातील एका चोरट्याने ड्रॉवर उचकण्यास सुरुवात केली. यावेळी चोरटे त्यांना जीवे मारण्याची धमकी देत होते. पैसे काढून द्या नाहीतर जीवे मारू, असे म्हणून चोरट्यांनी टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेले 1 लाख 90 हजार 370 काढून घेवून बाहेर आले. चौघेही चोरटे एकाच मोटर सायकलवर आले होते. चोरी करून परत चालत जाताना दीडशे मीटर अंतरावर मोटर सायकल पंपावरील कर्मचारी पकडतील या भीतीने त्यातील एका चोरट्याने हातातील पिस्तुलाने हवेत गोळीबार केला. त्यामुळे कर्मचारी घाबरले गेले. चौघेही चोरटे मोटर सायकल वरून नारायणगावच्या दिशेने फरार झाले. घटनेची माहिती कळतच मंचर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरु आहे.

COMMENTS