इस्लामपूर : सम्राट अशोक विजया दशमी 69 वा धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त धम्म रॅलीत सहभागी झालेले मान्यवर. इस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूरात सम्

इस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूरात सम्राट अशोक विजयादशमी, 69 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना धम्म रॅलीने अभिवादन करण्यात आले. शहरातील प्रमुख मार्गावरून निघालेल्या रॅलीत बौध्दध्वज, घोषवाक्ये आणि जयभीमच्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. समता सैनिक दलाकडून सलामी देण्यात आली.
इस्लामपूर शहर आणि वाळवा तालुक्यातील बौध्द बांधवांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज, अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. भारतीय बौध्द महासभा, समता सैनिक दल, तक्षशिला ज्ञान केंद्र, वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पार्टी, रिपब्लिकन चळवळीतील कार्यकर्ते व बौध्द बांधव यांनी संयोजन केले. वंचित आघाडीच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. क्रांती सावंत, डॉ. दिलीप सावंत, ज्येष्ठ नेते शरद कांबळे, अनिसचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे, वाळवा पं. स. चे माजी सभापती शैलेंद्र सूर्यवंशी, तक्षशिला ज्ञान केंद्राचे अध्यक्ष अवधूत कांबळे, योगेश कुदळे, प्रा. अर्जुन पन्हाळे, प्रा. मिलिंद खंडेलोटे, प्रा. जी. व्ही. माने, वंचितचे सुमेध माने, बसपाचे अमोल कांबळे, पिराजी थोरवडे, महेश परांजपे, अरविंद कांबळे, प्रा. राजेंद्र पवार, उमेश सूर्यगंध उपस्थित होते. भारतीय बौध्द महासभेचे जयसिंग कांबळे, सचिन कांबळे, किशोर जाधव, दीपक बनसोडे, तक्षशिलाचे संचालक यशवंत धुमाळे यांनी संयोजन केले.

COMMENTS