Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रिपब्लिकन पक्षाचा मोर्चा; साळवे कुटुंबीयांना पोलीस संरक्षण व आरोपींवर मोक्का लावण्याची मागणी

अहिल्यानगर (प्रतिनिधी) – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) तर्फे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या कुटुंबीयांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्य

महाराष्ट्र व गुजरात देशाच्या विकास आणि जागतिक पटलावर नाव चमकणारी राज्ये : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
सामान्यांचा विकास हीच आमची एकमेव भूमिका
 ओबीसी महिला सरपंच व सरपंच प्रतिनिधी यांना ग्रामपंचायत सदस्या कडून मारहाण 
Displaying DSC_4794.JPG

अहिल्यानगर (प्रतिनिधी)रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) तर्फे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या कुटुंबीयांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला. या प्रकरणातील आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी तसेच साळवे कुटुंबीयांना पोलीस संरक्षण द्यावे, या मागण्यांसाठी आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन सादर केले.

या मोर्चामध्ये श्रीकांत भालेराव, विजय वाकचौरे, शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे, उत्तर महाराष्ट्र सचिव अजयराव साळवे, सुरेंद्र थोरात, राज्य उपाध्यक्ष दीपकराव गायकवाड, अमित काळे, भीमा बागुल, राजू बडे, राजू जगताप, बाबा राजगुरू, आदिनाथ भोसले, विजय भांबळ, संजय कांबळे, ज्योती पवार, आरतीताई बडेकर, युवराज गायकवाड, पप्पू बनसोडे, राजू नाना गायकवाड, सतीश मगर, धनंजय निकाळे, विजयराव खरात, कैलास कासार, अनिल नलावडे, विवेक भिंगारदिवे, विलास साळवे, सुरेश भागवत, प्रदीप लोखंडे, गौरव मगर, अमोल आहेर, राकेश गरुड, महेश अंगारखे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, जामखेड तालुक्यातील नानज गावात गुंडांच्या टोळ्यांनी दहशत निर्माण केली असून नागरिकांना मारहाण करणे, खंडणी उकळणे, दुकानदारांना त्रास देणे, तसेच अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणे असे गंभीर प्रकार घडत आहेत. या गुन्ह्यांना साळवे यांनी पूर्वी विरोध दर्शवला होता. त्याचाच राग मनात ठेवून त्यांच्या कुटुंबीयांवर तलवार, कोयते, लोखंडी रॉडसह जीवघेणा हल्ला करण्यात आला. महिलांनाही गंभीर दुखापत झाली तर अभिजीत साळवे यांच्यावर तब्बल १५–१६ वार करण्यात आले.

आरपीआयने निवेदनातून मागणी केली आहे की या प्रकरणातील आरोपींवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करून सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी, घटनेचा सूत्रधार कोण हे शोधावे, कलम 120 (ब) अंतर्गत कारवाई करावी, आरोपींच्या कॉल डिटेल्स तपासाव्यात व केस फास्टट्रॅक कोर्टात चालवावी. काही आरोपी अटकेत असून अनेक अजूनही मोकाट फिरत आहेत, हे गंभीर असून तातडीने कठोर कारवाई व्हावी, अशी मागणीही करण्यात आली. याशिवाय, सुनील साळवे व त्यांच्या कुटुंबीयांना तातडीने पोलीस संरक्षण द्यावे, अन्यथा आरपीआयकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.

COMMENTS