अहिल्यानगर : वसुंधरेच्या संवर्धनासाठी तथा सवलतीचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या' गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडणाऱ्या ग्राहकांना महावितरणकडून दरमहा

अहिल्यानगर : वसुंधरेच्या संवर्धनासाठी तथा सवलतीचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या’ गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडणाऱ्या ग्राहकांना महावितरणकडून दरमहा छापील कागदी बिला ऐवजी ई – मेल द्वारे वीज बिल पाठविण्यात येते. पहिल्याच वीज बिलात पुढील बारा महिन्यासाठी तत्काळ १२० रूपये एकरकमी सवलत देण्यात येते. या योजनेची थेट माहिती तथा तात्काळ नोंदणी करून जास्तीत जास्त ग्राहकांना लाभ देण्यासाठी महावितरणच्या अहिल्यानगर शहर तथा ग्रामीण ग्रामीण विभागातील सर्व उपविभागीय
तथा ३० शाखा कार्यालयांमध्ये गो ग्रीन नोंदणी शिबिर सोमवारी दिनांक १ सप्टेंबर रोजी दिवसभर कार्यालयीन वेळेत आयोजित करण्यात आले आहे, याचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. कागद वाचवा, पर्यावरण वाचवा’ या संकल्पनेनुसार गो-ग्रीन सेवा राबविण्यात येत असून दरमहा छापील कागदी बिलाऐवजी ई – मेल द्वारे वीज बिल स्वीकारण्याच्या गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडल्यानंतर ग्राहकांना तत्काळ वीज बिलात एकरकमी १२० रुपये सूट महावितरणकडून दिली जात आहे. यानंतर पुढील वर्षभर व सेवेसाठी नोंदणी रद्द करेपर्यंत नोंदणीकृत ई-मेलवर वीज बिल पाठविण्यात येणार असून त्यापुढे दरमहा वीज बिलात १० रुपये सूट देण्यात येणार आहे.
महावितरणच्या www.mahadiscom.in संकेतस्थळ आणि महावितरण ॲपच्या माध्यमातून गो ग्रीन नोंदणी करता येते. अहिल्यानगर मंडलातील ग्राहकांना गो-ग्रीन नोंदणी कशी करावी तसेच गो-ग्रीन नोंदणी केल्यानंतर मिळणारे फायदे दर्शविणारे पोस्टर्स तयार करण्यात आले आहे. सदर पोस्टर्सवर गो ग्रीन माहिती व सोबत या संदर्भातील व्हिडीओचा क्यूआर कोड देण्यात आलेला आहे. ग्राहकांनी मोबाईल च्या माध्यमातून सदर क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर चित्रफितीच्या माध्यमातून गो-ग्रीन नोंदणी कशी करावी या संदर्भात माहिती देण्यात आली आहे. सदर पोस्टर्स महावितरणच्या अधिकृत वीजबिल भरणा केंद्राच्या परिसरात तथा शहरातील कार्यालयात लावण्यात आलेले असून विद्युत ग्राहकांनी सदर पोस्टर्स वरील क्यूआर कोड मोबाईल द्वारे स्कॅन करून चित्रफितीद्वारे दिलेल्या माहितीच्या अनुषंगाने गो-ग्रीन नोंदणी करण्याची सोय उपलब्ध आहे. वीजबिलासाठी ई-मेल व एसएमएसचा पर्याय निवडल्याने या ग्राहकांना दर महीन्याला प्रत्येक वीजबिलामागे १० रूपयाची सुट देण्यात येत आहे. अहिल्यानगर शहर आणि पारनेर उपविभाग अंतर्गत असलेल्या ३० शाखा कार्यालय अंतर्गतअसलेल्या जास्तीत जास्त ग्राहकांनी गो-ग्रीन योजनेत सहभाग होऊन पर्यावरण रक्षणाचा व सवलतीचा लाभ घेण्यासाठी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन महावितरण अहिल्यानगर शहर तथा ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता योगेश चव्हाण यांनी केले आहे.

COMMENTS