Homeताज्या बातम्यासंपादकीय

सत्तेतील पवार दाम्पत्य दोलायमान का ?

    राज्याचे द्वितीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पत्नी तथा राज्यसभेच्या खासदार तथा राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पत्

Parbhani : मुख्यमंत्र्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा करताच जल्लोष साजरा
भाजपा आमदार राम सातपूते यांच्या समर्थनार्थ श्रीरामपुरात भव्य रँली
दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब

    राज्याचे द्वितीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पत्नी तथा राज्यसभेच्या खासदार तथा राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पत्नी सुनेत्राताई पवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यक्रमाला उपस्थिती दिल्याने अजितदादा पवार यांच्या समर्थकांमध्ये खळबळ उडाली आहे. यासंदर्भात त्यांना पत्रकारांनी ही प्रश्न विचारून घेतले; मात्र, सराईत राजकारण्याला शोभणारे वेळ निभावून नेणारे उत्तर त्यांनी दिले. त्या कोणत्या कार्यक्रमाला जातात यावर आपण लक्ष ठेवत नाही; असं उत्तर त्यांनी दिले. अर्थात, खासदार असलेल्या महिलेने एखाद्या कार्यक्रमात जाणे हा काही वादाचा किंवा चर्चेचा मुद्दा होवू शकत नाही! मात्र, त्यावर चर्चा यासाठी होतेय की, स्वतः अजितदादा पवार या विषयावर थेट उत्तर देऊ शकले नाही. शिवाय, सुनेत्राताई पवार या ज्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या तिथे आपण कोणत्याही राजकीय उद्देशाने गेलो नसल्याचे त्या म्हणताहेत. मुळात प्रश्न असा आहे की, जो कार्यक्रम भाजपच्या खासदार कंगणा रनौत यांच्या घरी झाला, तो कार्यक्रम संघाच्या महिला शाखेचा म्हणजे राष्ट्र सेविका समितीचा होता. या कार्यक्रमात राजकारण करण्याच्या उद्देशाने कुणीच जात नाही. कारण, हे कार्यक्रम सांस्कृतिक उद्दिष्टांसाठी वाटचाल करणारे असतात. यात तुम्ही खासदार असा नाहीतर मंत्री, पण, तेथे तुमचे स्थान दुय्यम ठरते.‌ त्या कार्यक्रमाला एक सांस्कृतिक प्रमुख असतो आणि हा प्रमुख एकप्रकारे उपस्थितांना सांस्कृतिक उद्दिष्ट प्राप्तीसाठी नेमकं काय कारायला हवं, याचं मार्गदर्शन करणारे असतात. हे मार्गदर्शन म्हणजे देशात पूर्ण सांस्कृतिक बदल घडविण्यासाठी असते. या सांस्कृतिक बदलासाठी मनुस्मृती हे मार्गदर्शक तत्वज्ञान म्हणून वापरले जाते! नेमका हाच भाग पत्रकारांच्या खोचक प्रश्नांच्या मागे असतो. हा भाग तुम्हाला मान्य आहे का? हेच पत्रकार जाणून घेण्यासाठी प्रश्न विचारतात. हीच अडचण अजितदादा पवार आणि सुनेत्राताई यांचीही झाली. कारण, या बाबींचे समर्थन केले तर, राजकीय जनतळ जो त्यांच्या सोबत आहे, तो खसकायला वेळ लागणार नाही, हे त्या दोघांना चांगले कळते. म्हणून ते या उपस्थितीचे थेट समर्थन करू शकलेले नाहीत. परंतु, लोक यापासून अनभिज्ञ नसतात. मुळातच, भाजप सोबत राजकीय सत्तेत सामिल होताना या लोकांना केव्हा संघमय व्हावे लागते ते त्यांचे त्यांनाच कळत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी अजितदादा पवार यांच्यावर पाखंड करण्याचा आरोप केला आहे. हे पाखंड म्हणजे तुम्ही सांस्कृतिकदृष्ट्या कोणता विचार स्विकारतात, याचा निदर्शक आहे. संविधान संमत असणाऱ्या बाबींच्या विरोधात उभ्या असलेल्या तत्त्वाला तुम्ही स्विकारतात की, नाकारतात एवढीच बाब यात स्पष्ट करायची असते. परंतु, ती हिंमतच अजितदादा पवार यांच्यामध्ये दिसत नाही.‌ कारण, ही हिंमत दाखवणं म्हणजे स्वतःच्या राजकारणाचे पानिपत करून घेणे आहे. खासदार कंगना रनौत यांच्या घरी झालेल्या या कार्यक्रमाला सर्व महिला या खाली बसलेल्या आहेत आणि त्यांच्या समोर खुर्चीवर एक पुरुष मार्गदर्शक बसलेला दिसतो. ही प्रतिमा स्वतः खासदार कंगना रनौत यांनीच पोस्ट केली असल्यामुळे त्यावर आक्षेप घेण्याचे कुणाचे कारण नाहीच! पण, प्रश्न असा आहे की, ज्या कार्यक्रमाला खासदार सुनेत्राताई उपस्थित आहेत त्यावर त्यांना स्वतःला आणि अजितदादा पवार यांनाही सारवासारव का करावी लागत आहे? हा खरा प्रश्न आहे. याचाच अर्थ अजितदादा यांची वैचारिक स्पष्टता अजूनही नाही.‌ माणूस राजकीय सत्तेत कितीही मोठा झाला तरी त्याचा सांस्कृतिक पाया कुठे आहे, यावर बरेच काही ठरते.‌राज्यातील सत्ताधारी पवार दाम्पत्याला यावर करावी लागणारी सारवासारव ही फार सहज नाही; तर, त्यामागे मोठा अर्थ दडलेला आहे.

COMMENTS