सततच्या लॉकडाउनला भाळवणीकर वैतागले, व्यापारी वर्गात प्रशासनाविरुद्ध संताप

Homeअहमदनगर

सततच्या लॉकडाउनला भाळवणीकर वैतागले, व्यापारी वर्गात प्रशासनाविरुद्ध संताप

भाळवणी (प्रतिनिधी) :-  कोविडचा प्रादुर्भाव पारनेर तालुक्यातील काही गावांमध्ये सतत वाढत असल्याचे कारण पुढे करत प्रशासनाने भाळवणीसह तालुक्यातील बारा

मराठा समाजाने शिर्डीच्या कार्यक्रमाच्या बसेस पाठवल्या रिकाम्या
शिवसेनेमुळे अनेक नागरिकांना दिलासा : डॉ. तोरडमल
ग्रामपंचायत कार्यालयामध्ये दारू पिऊन गोंधळ घातला गुन्हा दाखल

भाळवणी (प्रतिनिधी) :- 

कोविडचा प्रादुर्भाव पारनेर तालुक्यातील काही गावांमध्ये सतत वाढत असल्याचे कारण पुढे करत प्रशासनाने भाळवणीसह तालुक्यातील बारा गावांमध्ये सलग चौदा दिवस लाॅकडाउन जाहिर केल्याने चौदा दिवसांपासून संपुर्ण बाजारपेठेतील व्यवहार ठप्प झाले असून 

तीन तारखेपर्यंत बंदचे आदेश असताना चार तारखेला दुकाने उघडण्याची तयारी सर्वजण करत असताना पुन्हा दहा दिवसांसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तालुक्यातील भाळवणीसह सहा गावे बंद ठेवण्याचे आदेश काढल्याने व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. 

सध्या सणासुदीचे दिवस जवळ आले असताना या सर्वच गावांमधील व्यवहार ठप्प झाले असून  सर्वांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या लॉकडाउनच्या कालावधीत लहान – मोठे सर्वच व्यावसायिक हवालदिल झाले आहेत. 

या बंदला सर्वजण कंटाळले असून हे लॉकडाउन प्रशासनाने शिथिल न केल्यास व्यापारी आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत. तशा चर्चा व्यापाऱ्यांमध्ये सुरु आहेत.

COMMENTS