Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीमती प्रज्ञा वाळके यांच्यावर “कोण” मेहरबान ? ; निलंबित कार्यकारी अभियंता बनल्या त्याच विभागाच्या मुख्य अभियंता

मुंबई : सार्वजनिक बांधकाम विभागात सध्या बदल्यांचा वेगळाच घोळ सुरू असल्याचे दिसून येत आहे. कर्तव्यदक्ष अधिकार्‍यांना डावलून निलंबित अधिकार्‍यांवरच

जिल्ह्यातील धरणांमध्ये 49.11 टक्के पाणी साठा
कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा
सोमठाणा गावच्या चेअरमन पदी बिनविरोध मारोती पांडुरंग कदम पांडे तर व्हाईस चेअरमन पदी नामदेव शंकरराव पा. शिंदे

मुंबई : सार्वजनिक बांधकाम विभागात सध्या बदल्यांचा वेगळाच घोळ सुरू असल्याचे दिसून येत आहे. कर्तव्यदक्ष अधिकार्‍यांना डावलून निलंबित अधिकार्‍यांवरच हा विभाग मेहरबान असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच मुंबई सा.बां. प्रादेशिक विभागाच्या निलंबित कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके यांना त्याच विभागाच्या मुख्य अभियंता पदावर वर्णी लागल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नुकत्याच झालेल्या अधीक्षक अभियंत्यांच्या बदल्या आणि पदोन्नतीमध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याची चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे मुख्य अभियंता पदावर रहाणे यांचा बदलीचा कार्यकाळ शिल्लक असतांना देखील त्यांची उचलबांगडी करून त्यांना नाहक मनस्ताप होऊन ’तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन’ करावा लागत आहे. त्यामुळे चांगल्या अधिकार्‍यांना डावलून निलंबित अधिकार्‍यांना संधी देण्यामागे मोठे आर्थिक गौडबंगाल असून यातून मोठी आर्थिक देवाण-घेवाण झाल्याची चर्चा रंगतांना दिसून येत आहे.
अधीक्षक अभियंत्यांच्या नुकत्याच झालेल्या बदल्या आणि पदोन्नतीमध्ये ज्यांच्या नाममात्र प्रशासकीय चौकशा सुरू असल्यामुळे त्यांची पदोन्नती नाकारली आहे. त्यामुुळे अशा अधिकार्‍यांमध्ये असंतोषाची लाट उमटतांना दिसून येत आहे. असे असतांना दुसरीकडे कार्यकारी अभियंता म्हणून निलंबन झालेल्या प्रज्ञा वाळके यांची त्याच विभागात मुख्य अभियंता म्हणून वर्णी लागल्याने श्रीमती वाळके यांच्यावर नेमके कोण मेहरबान आहेत? त्यामुळेच त्यांची पदोन्नती होवून त्यांना निलंबित झालेल्या विभागाचे मुख्य अभियंता म्हणून नियुक्ती देण्यामागे कोण मेहरबान आहे? अशी चर्चा सार्वजनिक बांधकाम विभागात सुरू आहे. कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक अधिकार्‍यांना डावलून भ्रष्टाचाराचे आरोप असणार्‍या आणि निलंबित झालेल्या अधिकार्‍याला पुन्हा अशी संधी देणे ही सार्वजनिक बांधकाम विभागाची मोठी नामुष्की असल्याचे बोलले जात आहे.

श्रीमती प्रज्ञा वाळकेंवर यापूर्वी गंभीर आरोप
श्रीमती प्रज्ञा वाळके यांच्यावर यापूर्वी भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले आहेत. श्रीमती वाळके यांच्याविरुध्द जुलै 2017 ते फेब्रुवारी 2018 दरम्यान, भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील आ. चरण वाघमारे यांनी दक्षिण मुंबईतील ’मनोरा’ आमदार निवासात सुरु असलेल्या दुरुस्तीच्या कामांच्या 22 तक्रारी केल्या होत्या. तक्रारीनंतर अधीक्षक अभियंता अरविंद सूर्यवंशी यांनी चौकशी करीत प्राथमिक अहवालातील दोषी उपअभियंता भूषणकुमार फेगडे आणि विभागीय अभियंता केशव धोंडगे यांना निलंबित केले होते. त्यानंतर श्रीमती प्रज्ञा वाळके यांची विभागाने ’उचलबांगडी’ करत त्यांना नवी मुंबई येथे हलविले होते. त्यानंतर फ्लाईंग स्कॉडचे प्रभारी आणि अधीक्षक अभियंता धनंजय चामलवार यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांची सखोल चौकशी केली. त्यात श्रीमती वाळके यांनी पडताळणी न करता बिले मंजूर केल्याने कर्तव्यात निष्काळजीपणा केल्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर केला. त्यानंतर तो मुख्यमंत्र्यांनी प्रस्ताव मंजूर करीत सा. बां.विभागाचे तत्कालीन प्रधान सचिव आशिषकुमार सिंह यांनी प्रतिकुल अहवाल आल्यानंतर श्रीमती वाळके यांना निलंबित करण्यात आले होते.

…तोपर्यंत मालिका सुरूच राहणार
श्रीमती प्रज्ञा वाळके यांना दैनिक लोकमंथनच्या प्रकरणात निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना पुन्हा त्याच विभागात मुख्य अभियंता पदावर पदोन्नती देवून सार्वजनिक बांधकाम विभाग आणि प्रशासन नेमका काय संदेश देवू पाहत आहे? असा सवाल उपस्थित होत आहे. जोपर्यंत श्रीमती वाळके यांची पदोन्नती रोखत नाही, तसेच त्याच विभागात पदोन्नती देण्याऐवजी त्यांना इतरत्र चार्ज देत नाही, तोपर्यंत आम्ही आमची मालिका सुरूच ठेवणार आहोत.

COMMENTS