Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबई बॉम्बस्फोट प्रकरण ; उच्च न्यायालयाचा निर्णय स्थगित

नवी दिल्ली : मुंबईत जुलै 2006 मध्ये लोकल ट्रेनमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाला सर्वोच्च न्यायालया

मुंबईमध्ये रंगला ओलीस नाट्याचा थरार ; रोहित आर्यचा एन्काउंटर
महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाला गती, २० हजार ७८७ कोटींची तरतूद
पेट्रोल, सीएनजी पंपाची डीलरशीप देतो म्हणून 61 लाखांची फसवणूक
साखळी बॉम्बस्फोट : उच्च न्यायालयाच्या निर्णयाला 'सर्वोच्च' स्थगिती; आरोपी  पुन्हा तुरुंगात जाणार? Maharashtra Marathi News | Big Breaking: Mumbai  Local Train bomb blasts ...

नवी दिल्ली : मुंबईत जुलै 2006 मध्ये लोकल ट्रेनमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाला सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी स्थगिती दिली आहे. दरम्यान या प्रकरणातील आरोपींच्या सुटकेला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. मुंबईत 11 जुलै 2006 रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी सत्र न्यायालयाने 30 सप्टेंबर 2015 रोजी 7 जणांना जन्मठेप आणि 5 जणांना मृत्यूदंड ठोठावला होता. यापैकी एका आरोपीचा 2021 मध्ये कोरोनाने नागपूर कारागृहात मृत्यू झाला होता. या बॉम्बस्फोटात 189 जणांचा मृत्यू झाला असून 800 हून अधिक लोक जखमी झाले होते. परंतु, हायकोर्टातील न्या. अनिल किलोर आणि न्या. श्याम चांडक यांच्या विशेष खंडपीठाने 21 जुलै रोजी सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द करत सर्व 11 आरोपींची मुक्तता केली होती.

COMMENTS