Homeताज्या बातम्यादेश

नर्गिस मोहम्मदी यांना शांततेचा नोबेल

इराणमध्ये 31 वर्षांपासून तुरुंगात कैद

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः तब्बल 31 वर्षांपासून इराणच्या तुरुंगामध्ये असलेल्या इराणी महिला पत्रकार आणि कार्यकर्त्या नर्गिस मोहम्मदी यांना 2023 चा नोब

स्त्री-पुरुष समानतेच्या दिशेने…
अजित पवार भाजपमध्ये जाणार ः अंजली दमानिया
अखेर प्रथमेश परबच्या लग्नाची तारिख ठरली !

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः तब्बल 31 वर्षांपासून इराणच्या तुरुंगामध्ये असलेल्या इराणी महिला पत्रकार आणि कार्यकर्त्या नर्गिस मोहम्मदी यांना 2023 चा नोबेल शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. नोबेल समितीने महिला स्वातंत्र्य आणि त्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवल्याचे मान्य केले आहे. त्यांना 13 वेळा अटकही झाली होती. दरवर्षी 6 पैकी 5 पुरस्कार विजेत्यांची निवड स्वीडनमध्ये केली जाते तर नोबेल शांतता पुरस्कार विजेत्याची निवड नॉर्वेमध्ये केली जाते.
51 वर्षीय नर्गिस अजूनही इराणमध्ये कैद आहेत. त्याला 31 वर्षे तुरुंगवास आणि 154 फटके मारण्यात आले आहेत. सरकारविरोधात अपप्रचार केल्याच्या आरोपावरून इराणने त्याला अटक केली आहे. नोबेल मिळाल्यानंतर नर्गिस यांना 8.33 कोटी रुपयांचे बक्षीस आणि सुवर्णपदक देण्यात येणार आहे.  इराणमधील महिलांच्या हक्कासाठी काम केलेल्या नरगिस यांना सरकारने अटक केली होती.  नरगिस या डिफेंडर ऑफ ह्यूमन राईट सेंटर या संस्थेच्या उपप्रमुख आहेत. 2003 सालच्या नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या शिरीन एबादी यांनी या संस्थेची स्थापना केली होती. नरगिस यांना आतापर्यंत 13 वेळा अटक करण्यात आली आहे, तर पाच वेळा त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे. नोबेल शांतता पुरस्कार 1901 मध्ये सुरू झाला. आतापर्यंत 111 लोकांना आणि 30 संस्थांना हा सन्मान मिळाला आहे. याआधीही अनेकवेळा महात्मा गांधींना 5 वेळा नामांकन होऊनही नोबेल पारितोषिक न मिळाल्याबद्दल प्रश्‍न उपस्थित झाले आहेत.

COMMENTS