Homeताज्या बातम्यासंपादकीय

दोन सेना आणि एक युती !

 महाराष्ट्रात काल दोन राजकीय पक्षांची एक युती झाली; त्यावर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात चर्चा होतेय. ही युती म्हणजे आंबेडकर कुटुंबातील एक सदस्य आ

आषाढी वारीसाठी वारकर्‍यांच्या वाहनांना पथकरातून मिळणार सवलत
भीषण अपघात…पंक्चर काढायला उभ्या ट्रकवर दुसरा ट्रक धडकला | LOKNews24
नामदार थोरात यांनी केली गंगामाई घाट परिसराची पाहणी

 महाराष्ट्रात काल दोन राजकीय पक्षांची एक युती झाली; त्यावर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात चर्चा होतेय. ही युती म्हणजे आंबेडकर कुटुंबातील एक सदस्य आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेची युती ही सध्या सत्तेत असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना या पक्षाबरोबर झाली. वास्तविक, आंबेडकरी विचारधारेच्या राजकीय पक्षातून अशा प्रकारची युती करणारे आनंदराज आंबेडकर हे काही पहिले राजकीय नेते नाहीत; हो, एवढे मात्र खरे की, आंबेडकरी कुटुंबातील अशी युती करणारे ते पहिलेच आहेत. अशा प्रकारची युती म्हणजे नेमकी कोणती युती? तर, भारतीय जनता पक्षासोबत आघाडी असलेल्या पक्षा बरोबर केलेली युती. एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही भारतीय जनता पक्षा बरोबर सत्ता आघाडीत आहे. किंबहुना, ही सत्ता आघाडी खऱ्या अर्थाने एकनाथ शिंदे यांच्यापासूनच सुरू होते. लोकांचा आक्षेप आहे तो, भाजप आघाडीत सामील होण्यावर. मात्र, यापूर्वी उत्तर प्रदेशात कांशीराम आणि मायावती यांच्या बहुजन समाज पार्टीने थेट भारतीय जनता पक्षासोबत सत्ता युती केली होती. आज, भाजपची जी एनडीए आघाडी आहे, त्याची पायाभरणी याच बसपाने केलेल्या युतीत होती. बहुजन समाज पक्षाने भाजप सोबत युती करेपर्यंत महाराष्ट्रात शिवसेना आणि पंजाब मध्ये अकाली दल या पक्षांशिवाय कोणताही पक्ष भारतीय जनता पक्षासोबत युती करण्यास तयार नव्हता. बहुजन समाज पार्टीने भाजप सोबत सत्ता युती केल्यानंतर जाॅर्ज फर्नांडिस, शरद यादव, नितीशकुमार, रामविलास पासवान या सर्वच नेत्यांनी भाजप सोबत युती केली. येथूनच भारतीय जनता पक्षाची ताकद खऱ्या अर्थाने वाढायला सुरुवात झाली. रामविलास पासवान नंतर तर, आजीवन भाजप सोबत सत्तेत राहीले. आता त्यांचा मुलगा चिराग पासवान देखील सत्तेत आहेत. एवढंच कशाला, आपल्या महाराष्ट्रात बघा ना, दीर्घकाळापासून सत्ता युतीत असणारे रामदास आठवले. या सगळ्यांची उदाहरणे हेच दर्शवतात की, यांनी थेट भाजप सोबत युती करूनही मग ते आंबेडकरी चळवळीचा भाग कसा राहिले? याउलट, आनंदराज आंबेडकर यांनी तर थेट भाजप सोबत नव्हे, तर, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना सोबत राजकीय युती केली आहे. राजकारणात अशा युती आघाडी होत राहतात. राजकीय पक्ष आपल्या शक्ती निर्माण करण्याच्या दिशेने नेहमी प्रयत्न करत असतात. परंतु, त्यामागे त्यांचा उद्देश हा सत्ता संपादनाचा असतो. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका येत्या काही महिन्यात होतील. त्यामुळे आनंदराज आंबेडकर यांची खरी शक्ती मुंबईत आहे.  एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि आनंदराज आंबेडकर यांची रिपब्लिकन सेना या दोन्ही पक्षांना मुंबई महानगरपालिकेत सत्ता संपादनासाठी एक प्रशस्त मार्ग निर्माण होतो का, ही चाचपणी करणे ही दोन्ही पक्षांची गरज आहे. त्यातूनच ही युती निर्माण झाली असावी. परंतु, आनंदराज आंबेडकर असो किंवा राज्यातील कोणताही आंबेडकरवादी व्यक्ती असो, त्याला मात्र ही युती रुचलेली नाही! कारण, कोणताही आंबेडकरवादी व्यक्ती समजतो की, ही युती आंबेडकर वादाच्या विरोधात आहे आणि हीच या युतीच्या संदर्भात टीका होणारी खरी मेख आहे!

COMMENTS