युवकांनी गांधी तत्त्वज्ञानाशी नवा संवाद साधावा : डॉ. सप्तर्षी

Homeताज्या बातम्यादेश

युवकांनी गांधी तत्त्वज्ञानाशी नवा संवाद साधावा : डॉ. सप्तर्षी

पुणे ः महात्मा गांधी विचारांचे सामाजिक व राजकीय महत्त्व आजही कायम आहे. युवकांनी गांधी तत्त्वज्ञानाशी नवा संवाद साधावा, असे आवाहन महाराष्ट्र गांधी स्म

औरंगजेबाचे भक्त राजकारण करु इच्छित; मात्र त्यांना याच मातीत गाडलं | LokNews24
व्यावसायिक अभ्यासक्रम शुल्काचे अधिकार विद्यापीठांना
जामखेड तालूक्यात पाळला कडकडीत बंद

पुणे ः महात्मा गांधी विचारांचे सामाजिक व राजकीय महत्त्व आजही कायम आहे. युवकांनी गांधी तत्त्वज्ञानाशी नवा संवाद साधावा, असे आवाहन महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांनी केले. सगळे एकसारखे असावे, असे वाटणारा राष्ट्रवाद हा भरकटतो. राष्ट्रवाद हा प्रगल्भ नसेल तर भरकटतो. गांधीवाद हा भरकटलेल्या राष्ट्रवादाला उत्तर आहेफ, असेही ते म्हणाले.


महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल यांच्या संयुक्त विद्यमाने आज कोथरूडमधील गांधी भवन येथे  झालेल्या मगांधी दर्शनफ शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या 22 व्या शिबिरात विविध वयोगटांतील कार्यकर्त, नागरिक सहभागी झाले. लेखक आणि तंत्रज्ञानतज्ज्ञ डॉ. अच्युत गोडबोले यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि समाजावरील परिणाम या विषयावर अत्यंत समर्पक आणि विचारप्रवर्तक मांडणी केली. त्यांनी तंत्रज्ञानाच्या वेगाने बदलणार्‍या जगात गांधीजींच्या मूल्यांची गरज अधिक तीव्र असल्याचे अधोरेखित केले.

ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांनी जागतिकीकरण आणि स्थानिक समाजरचना यावर भाष्य करताना जागतिकीकरणाच्या विळख्यात हरवणार्‍या मूल्यांची आठवण करून दिली. त्यांनी सांगितले की, गांधीजींचे विचार जागतिकीकरणालाही मानवतेचा चेहरा देऊ शकतात. महाराष्ट्राने प्रबोधनाचे कार्यक्रम थांबवता कामा नये. केडर कॅम्प, शिबीरे सुरु राहिली पाहिजेत.बाजारपेठ जिंकणे हा जागतिकीकरणाचा उद्देश असतो. सार्वजनिक व्यवस्था बदनाम करून भांडवलशाहीकडे दिल्या गेल्या.इतिहासाची पुनरावृत्ती होत नाही, आणि इतिहास वर्तमानाचे प्रश्‍न सोडवत नाही. तरीही इतिहासासाठी आपण भांडत बसतोफ, अशीही टिप्पणी त्यांनी केली.

COMMENTS