सोनई/ शनिशिंगणापूर - नेवासा तालुक्यातील अग्रगण्य असणारी माजी मंत्री माननीय श्री शंकररावजी गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेली कांगोणी
सोनई/ शनिशिंगणापूर –
नेवासा तालुक्यातील अग्रगण्य असणारी माजी मंत्री माननीय श्री शंकररावजी गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेली कांगोणी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी सुनील नामदेव रौंदळ तर उपाध्यक्षपदी ज्ञानदेव मुरलीधर शिंदे यांची एकमताने निवड झाली आहे. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया नुकतीच संचालकाच्या बैठकीत ही निवड करण्यात आली मावळते अध्यक्ष दुर्योधन सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.
चेअरमन पदाची सूचना माजी अध्यक्ष दुर्योधन सोनवणे यांनी मांडली त्यास अनुमोदन संचालक रामभाऊ कराळे यांनी दिले.व व्हा.चेअरमन पदाची सूचना माजी उपाध्यक्ष सुभाष तुकाराम भालेकर यांनी मांडली, त्यास माजी अध्यक्ष दुर्योधन सोनवणे यांनी अनुमोदन दिले. याप्रसंगी जिल्हा सहकारी बँकेचे नोडल ऑफिसर एस जे रौंदळ हे सेवानिवृत्त झाल्याने त्यांना सेवा सोसायटीच्या व ग्रामस्थांच्या वतीने सन्मानित करण्यात आले.
यावेळी माजी अध्यक्ष दुर्योधन सोनवणे, माजी उपाध्यक्ष सुभाष भालेकर, संचालक रमेश कराळे, अशोक कर्डिले, महेश ठोंबळ, रामभाऊ कराळे, ज्ञानदेव शिंदे, सुनील रौंदळ, कारभारी कोकाटे, मच्छिंद्र कर्डिले,,मच्छिंद्र वडागळे, पोपट रौंदळ, गोरक्षनाथ ठोंबळ, ज्येष्ठ कार्यकर्ते बाळूकाका सोनवणे, बजरंग तुपे, संतोष ठोंबळ,पोपट ठोंबळ, सेवानिवृत्त बँक अधिकारी सुंदर बापू पुंड,क्लार्क आर. एन. शिंदे, सांगणक ऑपरेटर नितीन शिंदे, संतोष उणेचा आदी उपस्थित होते.
मेजर अशोक चौधरी यांनी नवनिर्वाचित चेअरमन वाई चेअरमन यांच्या निवडीचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरपंच सोमा भाऊ कराळे यांनी तर आभार संचालक रामभाऊ कराळे यांनी मानले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून योगेश नरसिंगपूरकर व सहाय्यक निवडणूक अधिकारी व्ही.एम.
खंडागळे यांनी कामकाज पाहिले. या नवीन पदाधिकाऱ्यांचे माजी मंत्री शंकररावजी गडाख, जिल्हा परिषदेचे माजी सभापती सुनील भाऊ गडाख, यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष उदय गडाख, माजी सभापती सुनीताताई गडाख यांनी सर्वांचे अभिनंदन केले आ हे. नवनिर्वाचित अध्यक्ष रौंदळ व उपाध्यक्ष शिंदे यांचा सत्कार करण्यात आला..


COMMENTS