व्यावसायिक गॅस पुन्हा 100 रुपयांनी महागला

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

व्यावसायिक गॅस पुन्हा 100 रुपयांनी महागला

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून, इंधनांच्या किंमती भडकत असतांनाच, पुन्हा या महिन्यात व्यावसायिक गॅस 100 रुपयांनी महागल्यामुळे छोटया व्यापारी, व्यावसा

‘बीसीसीआय’ वर्षाला 19 अब्ज कमावणार, इतर देशांचा होतोय जळफळाट
सहकाऱ्यांची मस्करी तरुणाच्या जीवावर | LOKNews24
कोतुळ शिक्षण संस्थेचे आज मंत्री आठवलेंच्या हस्ते उद्घाटन

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून, इंधनांच्या किंमती भडकत असतांनाच, पुन्हा या महिन्यात व्यावसायिक गॅस 100 रुपयांनी महागल्यामुळे छोटया व्यापारी, व्यावसायिकांचे कंबरडे मोडणार असल्याचे दिसून येत आहे. डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी व्यावसायीकांना महागाईचा झटका बसला आहे. एलपीजी सिलिंडर स्वस्त होण्याची अपेक्षा होती, मात्र सिलिंडरच्या किमती 100 रुपयांनी वाढल्या आहेत. सर्वसामान्यांच्या दृष्टिने दिलासादायक गोष्ट म्हणजे, घरगुती सिलिडंरचे दर स्थिर असून, त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. मात्र व्यवसायिक सिलिंडर 100 रुपयांनी वाढवण्यात आला आहे. दरम्यान सिलिंडरचे दर वाढल्याने महागाई आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पेट्रोलियम कंपन्यांनी आज एलपीजी सिलिंडरच्या किमतींचा आढावा घेतला. गेल्याच महिन्यात वाणिज्य वापराच्या सिलिंडरच्या किमतीत तब्बल 266 रुपयांची वाढ करण्यात आली होती. आज आणखी 100 रुपयांनी सिलिंडर महागला आहे. आजच्या दरवाढीनंतर मुंबईत 19 किलोच्या एलपीजी सिलिंडरचा भाव 2051 रुपये इतका वाढला आहे. दिल्लीत 19 किलोचा सिलिंडर आजपासून 2101 रुपये झाला आहे. तर चेन्नईत 2234 असा विक्रमी दर 19 किलो सिलिंडरसाठी झाला आहे. कोलकात्यात 19 किलो सिलींडरसाठी 2177 रुपये दर असेल. दरम्यान, आज वाणिज्य वापराच्या सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली असली तर घरगुती वापराच्या 14.2 किलोच्या सिलिंडरच्या किमती जैसे थे आहेत. यामुळे देशभरातील कोट्यवधी ग्राहकांना तूर्त दिलासा मिळाला आहे. मुंबईत विनाअनुदानित घरगुती गॅसचा दर 899.5 रुपये आहे. दिल्लीत तो 899.5 रुपये आहे. चेन्नईत 915.5 रुपये असून कोलकात्यात तो 926 रुपये आहे.

COMMENTS