बदनामी करणाऱ्या त्या महिलांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

Homeताज्या बातम्याअहमदनगर

बदनामी करणाऱ्या त्या महिलांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

शेवगावच्या त्या नगरसेवकाच्या सांगण्यावरुन बदनामी सुरु; महिला सामाजिक कार्यकर्त्याचा आरोप

नगर (प्रतिनिधी)- पैसे घेतल्याचा खोटा आरोप केल्याप्रकरणी बोल्हेगाव येथील त्या महिलांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रीय विश्‍वगामी समाजकार्य स

टेक्सासमध्ये भारतीय ध्वजाचा अवमान करत ‘इमिग्रेशन’ विरोधात निदर्शने; स्थानिक नागरिकाच्या संतापजनक कृत्याचा व्हिडिओ व्हायरल
बीडमध्ये मान्सूनपूर्व स्वच्छता मोहीम राबवा, नागरी समस्या सोडवाभाजपचे युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांची मुख्याधिकार्‍यांकडे मागणी
गुजरात-महाराष्ट्र महामार्गावर दोन बसेसचा भीषण अपघात, ७ प्रवाशांचा जागीच दुर्दैवी मृत्यू तर अनेक जण जखमी

नगर (प्रतिनिधी)- पैसे घेतल्याचा खोटा आरोप केल्याप्रकरणी बोल्हेगाव येथील त्या महिलांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रीय विश्‍वगामी समाजकार्य संघाच्या वतीने करण्यात आली आहे. संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची भेट घेऊन सदर मागणीचे निवेदन दिले.

शेवगाव येथील महिला सामाजिक कार्यकर्त्या स्वाती साठे यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, मी व माझ्या मुलीने पैसे घेतल्याचा खोटा आरोप बोल्हेगाव येथील काही राजकीय पदाधिकारी असलेल्या महिलांनी केला आहे. शेवगाव मधील एका नगरसेवकावर 3 जानेवारी 2025 रोजी ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला होता.

हा गुन्हा मागे घेण्यासाठी त्या नगरसेवकाच्या पत्नी व मुलाने मारहाण केली व पैसे देखील देऊ केले, मात्र गुन्हा मागे न घेतल्याचा राग मनात धरुन त्या नगरसेवकांनी या राजकीय महिलांना हाताशी धरुन बदनामी चालवली असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

आरोप करणाऱ्या महिलांचा व आमचा कसलाही संबंध नसताना फक्त बदनामी करण्याची सुपारी घेऊन हा प्रकार सुरु आहे. माझी व मुलीची व मानलेल्या भावाची बदनामी करणाऱ्या टोळीचा खरा चेहरा समोर आनण्यासाठी पोलीस प्रशासनाने सदर महिलांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी राष्ट्रीय विश्‍वगामी समाजकार्य संघाच्या वतीने करण्यात आली आहे.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष संजय शिंदे, तक्रारदार स्वाती साठे, पिनू भोसले, अजय पठारे, संजय वाल्हेकर आदी उपस्थित होते.

COMMENTS