Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नेवाशातील वाळू तस्करांचे धाबे दणाणले

पोलिसांची सलग दुसर्‍या दिवशी कारवाई सुरूच

भालगाव प्रतिनिधी ः नेवासा पोलिसांनी वाळू तस्करीला आळा घातला असून तालुक्यातील वाळू तस्कराचे धाबे दणाणून गेले आहे तसेच सलग दुसर्‍या दिवशी कारवाईचा

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांच्या सभेला रिपाइंने दिले समर्थन
अतिक्रमणात धोंडेवाडी अर्धे गाव उध्वस्त
वडगाव गुप्ता ग्रामस्थांनी केले सीना नदीचे जलपूजन

भालगाव प्रतिनिधी ः नेवासा पोलिसांनी वाळू तस्करीला आळा घातला असून तालुक्यातील वाळू तस्कराचे धाबे दणाणून गेले आहे तसेच सलग दुसर्‍या दिवशी कारवाईचा बडगा सुरूच आहे. रविवारी 9 एप्रिल रोजी नेवासा पोलिसांनी शहरातील संत ज्ञानेश्‍वर महाराज मंदिरा मागे वाळू वाहतूक करणारा डंपर पकडून बेडक कारवाई केली. त्यानंतर मंगळवारी 11 एप्रिल  रोजी नेवासा बुद्रुक गावातील माळी वस्ती ते जायगुडे आखाडा जाणारे रोडवर प्रवारा नदी पात्रात एक चॉकलेटी रंगाचा टम्पो अवैध रित्या वाळूची चोरटी वाहतूक करताना पकडला असून पोलिसांच्या सलगच्या कारवाई मुळे नागरिकांमधून पोलिस प्रशासनाचे कौतुक केले जात आहे.

याबाबत पोलीस नाईक राहुल यादव यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, 11 एप्रिल रोजी सकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास नेवासा बुद्रुक येथील माळी वस्ती ते जायगुडे आखाडा जाणार्या रोडवर एक पोपटी व चॉकलेटी रंगाचा विनानंबरचा टेम्पो त्यावरील आरोपी बाळासाहेब ऊर्फ प्रकाश खांदे (वय 35) रा. नेवासा बुद्रुक याने स्वतःच्या फायद्याकरीता विनापरवाना बेकायदा शासकीय मालकीची वाळू चोरुन ती वाहतूक करताना मिळून आला. त्याच्याकडून 12 हजार रुपये किमतीची दोन ब्रास वाळू व अंदाजे 2 लाख 20 हजार रुपये किमतीचा टेम्पो असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या फिर्यादीवरुन बाळासाहेब ऊर्फ प्रकाश खांदे याच्यावर भारतीय दंड विधान कलम 379 सह गौण खनिज कायदा 3/15 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल किशोर काळे करत आहेत. तर 9 एप्रिल रोजीच्या छाप्यात नेवासे पोलिसांनी शहरातील संत ज्ञानेश्‍वर महाराज मंदिरामागे वाळू वाहतूक करणारा डंपर पकडला आहे. याबाबत नेवासे पोलिस ठाण्यात पोलिस नाईक राहुल बबन यादव यांनी फिर्याद दिली. काल सकाळी 8 वाजताचे सुमारास पोहेकॉ गायकवाड, पोकॉ गणेश, पोकॉ. सुमीत करंजकर असे पोलिस ठाण्यात हजर होते. त्यावेळी पोनि डोईफोडे यांना माहिती मिळाली की नेवासे खुर्द गावातील माळी वस्ती येथे प्रवरा नदी पात्रातील एक लाल रंगाचे डंपर वाळूची चोरटी वाहतूक करीत आहे. त्यानंतर नेवासे पोलिस घटनास्थळी गेले. ज्ञानेश्‍वर महाराज मंदिराच्या पाठीमागे लाल रंगाचा बिना नंबरचा डंपर येताना दिसला. या डंपरमध्ये एक ब्रास वाळूने भरलेली दिसली. यावेळी डंपरचालक आमोल नामदेव धनवटेकर, क्य 27, रा. लक्ष्मीनगर नेवासे खुर्द हा विनापरवाना वाळू वाहतूक करताना आढळला. यावेळी एक ब्रास वाळू व 4 लाखांचा डंपर असा 4 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला केला.

COMMENTS