Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

फोटो शूट करताना दरीत गाडी कोसळली; तरूण गंभीर जखमी

पाटण / प्रतिनिधी : सडावाघापूर परिसरात पर्यटकांची सध्या जोरदार रेलचेल सुरु आहे. सडावाघापूरला जाताना टेबल पाँईंटवरती गाडी खोल दरीत कोसळून एकज

कालिकाईसह संपर्क अ‍ॅग्रोच्या कोट्यवधी फसवणूकप्रकरणी तीन संचालकांना अटक; सातारा अर्थिक गुन्हे शाखेची कारवाई
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठात राष्ट्रीय निबंध स्पर्धेचे आयोजन
सातार्‍यात ‘शिवराज्य दरबार स्फूर्तीस्थान’ उभारणार : श्री. छ. वृषालीराजे भोसले

पाटण / प्रतिनिधी : सडावाघापूर परिसरात पर्यटकांची सध्या जोरदार रेलचेल सुरु आहे. सडावाघापूरला जाताना टेबल पाँईंटवरती गाडी खोल दरीत कोसळून एकजण गंभीर जखमी झाला आहे. मंगेश तुकाराम जाधव (रा. म्हावशी) हा बकरी चारण्यासाठी गेला असता आवाज आला आणि त्याने घटनास्थळी पोहचला दरीतून गाडीचा दरवाजा तोडून अडकलेल्या व्यक्तीस बाहेर काढले. या घटनेने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले.
याबाबत अधिक माहिती, सडावाघापूर, ता. पाटणला जात असताना टेबल पाँईंटवरती अनेक पर्यटक फोटोशूट व करमणुकीसाठी थांबतात. बुधवार, दि. 9 रोजी सायंकाळी 4 च्या दरम्यान साहिल अनिल जाधव (वय 20, रा. गोळेश्‍वर, ता. कराड, जि. सातारा) हे आपल्या मित्रांसमावेत फिरण्यासाठी आले होते.
सोबतचे मित्र फोटो काढण्यात मग्न होते. दरम्यान गाडीमध्ये साहिल जाधव होते. गाडीला ब्रेक लागला नसल्याने व गवतावरुन गाडी घसरत गेल्याने गाडी खोल दरीत कोसळली. उपस्थित नागरिकांना आरडाओरडा करत प्रशासनाशी संपर्क साधला.
घटनास्थळी किंगमेकर अ‍ॅकॅडमीचे विकास संकपाळ, विद्यार्थी, अमित जाधव, पाटण पोलीस स्थानकाचे अधिकारी अविनाश कवठेकर, मोहिते, जय घाडगे, संकेत बापूराव घाडगे, टेबल पाँईटचे मालक परिसरातील नागरिकांनी प्रयत्न केले. जखमीस उपचारासाठी सह्याद्री हाँस्पिटल कराड येथे दाखल करण्यात आले.

COMMENTS