Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विरोधकांना खोट्या गुन्ह्यात अडकविणे ही जयंत पाटील यांची विकृत संस्कृती : पृथ्वीराज पवार

इस्लामपूर / प्रतिनिधी : पालकमंत्री जयंत पाटील यांनी आजपर्यंत आपल्या राजकिय वाटचालीत चांगले काम करणारी मंडळी कधी जवळ केली नाहीत. त्यांनी गुन्हेगार

सातारच्या मेडिकल कॉलेज प्रवेश प्रक्रियेस परवानगी; 100 विद्यार्थ्यांना मिळणार एमबीबीएसला प्रवेश
खा. शरद पवार साहेब यांच्या घरावरील हल्ल्याचा पाटणमध्ये निषेध
आता गुन्हेगाराच्या संपत्तीतून मिळणार पीडित व्यक्तीला मोबदला; नव्या विधेयकात खास तरतूद

इस्लामपूर / प्रतिनिधी : पालकमंत्री जयंत पाटील यांनी आजपर्यंत आपल्या राजकिय वाटचालीत चांगले काम करणारी मंडळी कधी जवळ केली नाहीत. त्यांनी गुन्हेगारी वृत्तीची टोळी स्वतःच्या पंखाखाली सदैव घेतली. समाजात अनेकांनी उभा केलेले चांगले काम मोडुन काढणे, विरोधकांना खोट्या गुन्ह्यात अडकविणे, त्यांना बदनाम करणे ही जयंत पाटील यांची विकृत संस्कृती झाली आहे. हे मोडुन काढण्यासाठी आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत. घाबरू नका, आपल्याला न्याय नक्की मिळेल, असा विश्‍वास भाजपाचे प्रदेश सचिव पृथ्वीराज पवार यांनी दिला.
इस्लामपूर येथील प्रकाश हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरमधील डॉक्टर व इतर कर्मचार्‍यांवर पालकमंत्री जयंत पाटील यांच्या दबावापोटी दाखल झालेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत. म्हणून प्रकाश शिक्षण कामगार युनियनच्या वतीने सुरू असलेल्या उपोषणास भाजपाचे प्रदेश सचिव पृथ्वीराज पवार यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते.
पृथ्वीराज पवार म्हणाले, प्रकाश हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर येथे कोरोना रूग्णावर चांगले उपचार झाले. सांगली जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अनेक कानाकोपर्‍यातुन रूग्ण उपचारासाठी आले. सर्व रूग्णांना व नातेवाईकांना चांगला अनुभव आला. जयंत पाटील यांना विरोधकांचे चांगले काम, उभा केलेले संस्थात्मक काम डोळ्यात खुपते. समाजात चांगली कामे करणारे लोक त्यांना आवडत नाहीत. त्यांना गुन्हेगारी वृत्तीची, अवैद्य व्यवसाय करणारे लोक जवळ लागतात. समाजात दहशत निर्माण करणे, पोलिस असो अथवा कोणतेही सरकारी अधिकारी असोत त्यांच्यावर दबाव आणून विरोधकांना बेकायदेशीरपणे गुन्ह्यात अडकविणे हे काम जयंत पाटील अत्यंत प्रमाणिकपणे करतात. सद्या आपल्यावर झालेली कारवाई ही अत्यंत दुर्दैवी असून जयंत पाटील यांच्यामध्ये माणुसकी राहिलेली नाही. पोलीस व आरोग्य अधिकार्‍यांनीही जयंत पाटील यांच्या दबावाला बळी न पडता आपण जनतेचे सेवक आहोत. समाजात चांगले काम करणार्‍या लोकांना बेकायदेशीरपणे आपण गुन्हेगार ठरवत असाल तर वेळप्रसंगी आपल्या विरोधात न्यायालयीन लढा उभा करावा लागेल. पोलीस व आरोग्य अधिकार्‍यांविरोधात दाखल झालेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत. वैद्यकिय सेवेत काम करणार्‍यांंना प्रोत्साहन द्यावे.
यावेळी प्रकाश शिक्षण कामगार युनियनचे सचिव कुलदीप खांबे, उपाध्यक्ष सुजित पाटील, हिम्मत जाफळे, रणजीत पाटील, रणधीर फार्णे, दिपक सराफदार, अंकुश मदने, निलेश कांबळे, निखील पाटील, रोहित पाटील, अविनाश पवार, सुशांत पाटील, वैभव चौधरी आदी पदाधिकारी व कर्मचार्‍यांनी पालकमंत्री जयंत पाटील, पोलीस व आरोग्य अधिकार्‍यांच्या चुकीच्या कार्यपध्दतीचा अहवाल भाजपाचे प्रदेश सचिव पृथ्वीराज पवार यांच्याकडे मांडला.
वाळवा तालुका भाजपा अध्यक्ष धैर्यशील मोरे, वाळवा तालुका भाजपा ओबीसी सेलचे अध्यक्ष मधुकर हुबाले, वाळवा तालुका भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजपा युवा मोर्चाचे संघटन सरचिटणीस संदीप सावंत, जिल्हा भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष प्रविण माने, भाजपा सरचिटणीस यदुराज थोरात, अक्षय पाटील, विश्‍वजीत पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

COMMENTS