सावकारकीतून शेतजमिन बळकावण्याचा प्रयत्न

Homeताज्या बातम्या

सावकारकीतून शेतजमिन बळकावण्याचा प्रयत्न

श्रीगोंदा : शिरूर येथील बेकायदेशीर सावकारी करणाऱ्या रमेशचंद रतनचंद धाडीवाला यांच्याकडून सुनील बाळू शिंदे (रा.ढवळगाव ता.श्रीगोंदा) यांनी घर खरेदीस

मलायका अरोराचा नवा लूक पाहून चाहत्यांना पडली भूरळ .
कोपरगावचे गतवैभव मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील -आ.आशुतोष काळे
‘चर्चेतील चेहरा’ कार्यक्रमात आदर्श सरपंच मयुर आंधळे यांचा केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते सन्मानित; प्रसिद्ध रामा इंटरनॅशनल हॉटेल मध्ये झालेल्या दिमाखदार सोहळ्यात झाला गौरव

श्रीगोंदा : शिरूर येथील बेकायदेशीर सावकारी करणाऱ्या रमेशचंद रतनचंद धाडीवाला यांच्याकडून सुनील बाळू शिंदे (रा.ढवळगाव ता.श्रीगोंदा) यांनी घर खरेदीसाठी व्याजाने पैसे घेतले होते. कर्जाची रक्कम व्याजासह परतफेड करुनही तारण म्हणून जमिनीचे बिनकब्जा करुन घेतलेले खरेदीखत पालटुन देण्यास टाळाटाळ करत जमिन बळकावण्याचा प्रयत्न सावकाराने केला अशी तक्रार सुनील बाळू शिंदे यांनी सहाय्यक निबंधक, श्रीगोंदा कार्यालयात दाखल केली आहे.

दिलेल्या तक्रार अर्जात सुनील शिंदे यांनी म्हटले आहे की, २०२२ साली घरगुती आर्थिक गरजेकरीता व नवीन घराच्या खरेदीसाठी बारा लाख रुपयेसंदीप जिजाबा ताठे यांना मागितले. त्यांनी  रमेशचंद रतनचंद धाडीवाल यांच्याकडून काही रक्कम घेऊन   १२ लाख रुपये देतो, परंतू त्या बदल्यात तुमची जमीन आमचे नावे तात्पुरती बिनकब्जा करुन द्यावे लागेल व दरमहा दोन टक्के व्याज द्यावे लागेल असे सांगितले.

मी गट नं. २८४ मधील २२ आर क्षेत्र खरेदीखत करून देण्यास मान्यता दिली. मात्र मी व्याजासह कर्जाची परतफेड करुनही रमेशचंद रतनचंद धाडीवाल हे माझे खरेदीखत पालटून न देता ज्यादा पैशाची मागणी करत आहेत. ज्यादा पैसे न दिल्यास ती जमीन दुसऱ्यास विकण्याची धमकी देत शिवीगाळ करून जमिन बळकावण्याचा प्रयत्न करत आहेत.

रमेशचंद रतनचंद धाडीवाल हे  बेकायदेशीर सावकारकी करत असून त्याने शिरुर तसेच श्रीगोंदा तालुक्यातील लगतच्या गावामध्ये सुमारे १० ते १५ कोटींची बेकायदेशीर सावकारकी चालविली आहे. तसेच त्याने अनेक गोरगरीब लोकांच्या जमिनी सावकारकीच्या नावाखाली बळकावल्या आहेत. तसेच माझी जमीन देखील त्याने अशाच प्रकारे सावकारकीच्या पैशांच्या नावाखाली बेकायदेशीरपणे बळकावण्याचा प्रयत्न करत आहेत असे तक्रारीत म्हटले आहे.

COMMENTS