Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात प्रसंगावधान राखत चिमुरडीला वाचवले

पुणे : कात्रज येथील गुजर-निंबाळकरवाडी, खोपडे नगरमधील सोनवणे बिल्डिंगमध्ये मंगळवारी सकाळी 9 वाजून 6 मिनिटांनी एक थरारक घटना घडली. याच बिल्डिंगमध्ये रा

डिजिटल युगात संवाद महत्त्वाचा : प्रभू गौर गोपाल दास
महापालिकेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन
शाहरूख खानचा अमेरिकेत अपघात

पुणे : कात्रज येथील गुजर-निंबाळकरवाडी, खोपडे नगरमधील सोनवणे बिल्डिंगमध्ये मंगळवारी सकाळी 9 वाजून 6 मिनिटांनी एक थरारक घटना घडली. याच बिल्डिंगमध्ये राहणारे अग्निशमन दलाचे जवान योगेश अर्जुन चव्हाण यांनी प्रसंगावधान राखत एका चार वर्षांच्या चिमुकलीचा जीव वाचवला. घटनेची माहिती देताना योगेश चव्हाण म्हणाले, मी माझ्या बिल्डिंगमधील उमेश सुतार नावाच्या व्यक्तीला ओरडताना पाहिले. त्यांचा आवाज ऐकून मी तात्काळ गॅलरीत आलो. पाहिले असता, सोनवणे बिल्डिंगच्या तिसर्‍या मजल्यावरील बेडरूमच्या खिडकीतून भाविका चांदणे (वय 4 वर्ष) नावाची मुलगी बाहेर पडण्याच्या स्थितीत अडकलेली दिसली. क्षणाचाही विलंब न लावता चव्हाण यांनी सोनवणे बिल्डिंगच्या दिशेने धाव घेतली आणि थेट तिसर्‍या मजल्यावर पोहोचले. त्यांनी पाहिले की घराला कुलूप होते आणि मुलगी घरात एकटीच होती. सुदैवाने, त्याच वेळी मुलीची आई तिच्या दुसर्‍या मुलीला शाळेत सोडून घरी परत येत होती. चव्हाण यांनी तात्काळ आईकडून दरवाजा उघडायला लावला आणि बेडरूमच्या खिडकीतून त्या चिमुकलीला सुखरूप घरात खेचून घेतले. त्यांच्या या धाडसी कामगिरीमुळे एक मोठा अनर्थ टळला आणि चिमुकलीचे प्राण वाचले.

COMMENTS