अहिल्यानगर /अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वसामान्य रेशन कार्ड धारकांना तीन महिन्यांचा धान्य पुरवठा अपूर्ण मिळत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर वा
अहिल्यानगर /
अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वसामान्य रेशन कार्ड धारकांना तीन महिन्यांचा धान्य पुरवठा अपूर्ण मिळत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. याबाबत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन तातडीने कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, गेल्या तीन महिन्यांपासून नियमित रेशन मिळाले नसून, नागरिकांना दोनच महिन्यांचे धान्य देऊन तिसऱ्या महिन्याचे धान्य नाकारले जात आहे. अनेक ठिकाणी दुकानदारांकडून रेशन कार्ड धारकांचे अनेक वेळा अंगठे (थंब) घेतले जात असून, दुकानं वेळेवर सुरू राहत नाहीत आणि दुकानदार उपस्थित नसतात असे निवेदनात म्हटले आहे.
याबाबत जिल्हा प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे आणि मनमानी करणाऱ्या दुकानदारांवर दहा दिवसांच्या आत योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष योगेश साठे, हनीफ शेख, योगेश गुंजाळ, जे डी शिरसाठ, प्रवीण ओरे, सुधीर ठोंबे, रवी किसन जाधव, प्रसाद भिवसने, राजीव भिंगारदिवे, गणेश राऊत, अमर निरभवने, चरण हरबा,कैलास पगारे,कैलास काटे,प्रमोद भिंगारदिवे, विश्वास वाघस्कर,आधी सह कार्यकर्ते उपस्थित होते.


COMMENTS